जाहिरात

प्रशांत'शेठ' किती कोटींचे मालक ? वाचा, सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांच्या यादीतील ठाकूरांच्या संपत्तीचा तपशील

2009, 2014 आणि 2019 या तीनही विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूरांपुढे शेकापचेच प्रमुख आव्हान होते.

प्रशांत'शेठ' किती कोटींचे मालक ? वाचा, सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांच्या यादीतील ठाकूरांच्या संपत्तीचा तपशील
पनवेल:

राहुल कांबळे

पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या लीना गरड यांच्यात लढत होणार आहे. प्रशांत ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामध्ये युवा, महिला, ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रशांत ठाकूर यांनी अर्ज भरण्यापूर्वी एक रॅली काढली होती. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली प्रांत अधिकारी कार्यालयाजवळ संपली. प्रशांत ठाकूर यांच्या शक्तिप्रदर्शनात खासदार श्रीरंग बारणे, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील सहभागी झाले होते. 

नक्की वाचा : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले तरी तिकीट कापलं, आयुष्य संपवण्याची भाषा करणारे वनगा 12 तासांपासून बेपत्ता!

अर्ज दाखल करतेवेळी प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. यामध्ये प्रशांत ठाकूर यांच्यासह त्यांच्या पत्नीच्याही संपत्तीचा तपशील देण्यात आला आहे. प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांची संपत्ती किती आहे त्यावर एक नजर टाकूया.

  • प्रशांत ठाकूर यांची चल मालमत्ता ही 46 कोटी 58 लाखांहून अधिक
  • वर्षा ठाकूर यांची चल मालमत्ता 12 कोटी 21 लाखांहून अधिक 
  • प्रशांत ठाकूर यांच्याकडे असलेल्या अचल मालमत्तेचे मूल्य हे 146 कोटींहून अधिक 
  • वर्षा ठाकूर यांच्याकडील अचल मालमत्तेचे मूल्य हे 270 कोटींहून अधिक 

प्रशांत ठाकूर पनवेल मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत. सलग चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महायुतीमध्ये शेकापला मानाचे स्थान न मिळाल्याने शेकाप आधीच नाराज आहे. शेकापचा पनवेल मतदारसंघ हा बालेकिल्ला मानला जायचा. पनवेलमधील जनतेला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. पाणी, आरोग्य, सिडकोतील नागरिकांचे प्रश्न हे निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना कदाचित अडचणीत आणणारे ठरू शकले असते मात्र विरोधकांची त्यासाठी एकजूट असणे गरजेचे होते, जे दिसत नसल्याने प्रशांत ठाकूर यांच्यासाठी यंदाची निवडणूक काहीशी सोपी झाल्याचे बोलले जात आहे.  

नक्की वाचा : अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड

खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीसारख्या भागात शेकापला आपले नगरसेवक टीकवणे शक्य झाले नव्हते. यातल्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याचा फटका महाविकास आघाडीलाही बसला होता. शिवसेना(उबाठा) तर्फे जिल्हाप्रमुख शिरीष घरत हे प्रयत्नशील होते मात्र त्यांच्याऐवजी लीना गरड यांना उमेदवारी देण्यात आली. घरत यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीचाही काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2009, 2014 आणि 2019 या तीनही विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूरांपुढे शेकापचेच प्रमुख आव्हान होते. यंदा शेकापने उमेदवार दिला तर शेकाप आणि मविआचे उमेदवार एकमेकांची मते खातील आणि त्याचा फायदा ठाकूर यांनाच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com