
Prime Minister Narendra Modi's Nagpur visit : आज गुढीपाडव्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. तसंच शहरातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त 4 हजारांहून अधिक पोलीस तैनात राहणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधानांच्या आजच्या नागपूर दौऱ्यात 47 चौकांमध्ये स्वागताची भाजपची योजना होती, मात्र स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप SPG च्या हरकती मुळे या नियोजनात बदल करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काही चौकांत नो मॅन्स लॅन्ड अर्थात तिथे त्यांच्या एक ही नागरिक नको अशी SPG ची भूमिका. त्या चौकात स्वागताचा बेत रहित करावा लागला आहे. SPG च्या हरकतीमुळे, भाजपच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. उर्वरित चौकांमध्ये सुद्धा सजावट, स्वागताचे फलक तसेच गुढी उभारून स्वागत करण्यात येणार आहे. नागपुरात पंतप्रधानांच्या दौऱ्या दरम्यान ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त. 4 हजारावर पोलिस तैनात राहणार असू. बाहेरून दीडशे अधिकारी बोलवण्यात आले आहेत. मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून सुरक्षा व्यवस्थेत विशेष लक्ष देण्यात आले आहे.
नक्की वाचा - Tuljapur News: येत्या 2 वर्षात तुळजापूरचा कायापालट, हेरिटेज टूरचा समावेश, आणखी काय काय होणार?
मोदींचा सविस्तर दौरा-
- सकाळी 8.45 वाजता- पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर येतील
- सकाळी 9 वाजता- रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देतील. माजी सर कार्यवाह भैय्याजी जोशी त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी श्रद्धा सुमने अर्पण करतील
- सकाळी 9.30 वाजता- पंतप्रधान मोदी यांचं दीक्षाभूमी येथे आगमन होईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशास अभिवादन करतील. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित राहतील
-सकाळी 10 वाजता- माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक डॉ मोहन भागवत हे सुद्धा यावेळी मंचावर असतील
-सकाळी 11.15 वाजता- मोदी बाजारगावकडे निघतील. मोदींच्या हस्ते बाजारगाव येथील सोलार डिफेन्स, एअरोस्पेस लिमिटेडमध्ये या संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होईल
- दुपारी 1.30 वाजता- नागपूर विमानतळावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडसाठी रवाना होतील
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world