अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Pune Crime: तुम्ही आजपर्यंत सोनं, चांदी, मोबाईल, महागड्या गाड्या अशा अनेक मौल्यवान आणि किंमती वस्तू चोरीला गेल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील किंबहुना पहिल्या असतील पण अशी गोष्ट ती अनपेक्षित आहे ती पुण्यात झाली नाही असं होणार आहे का? आता बघा पुण्यात चक्क ८०० जिवंत कोंबड्या चोरीला गेल्या आहेत.
एका बाजूला भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने चोरल्याची घटना पुण्यात ताजी असतानाच पुण्यातील एका पार्किंगमधील वाहनातून ८०० जिवंत कोंबड्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळ्या प्रकार घडला आहे तो पुणे शहरातील कॅम्प भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये. या प्रकरणी धनंजय उरड (वय ५०) यांनी पोलिसात दिल्यावर लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : सिया गोयलच्या वडिलांना तुकाराम मुंढेंचा दणका; प्रशासनाची मोठी कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १३ जुलै सोमवारी पहाटे कॅम्प भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट मध्ये घडला. ५० वर्षीय तक्रारदार एका चिकन सेंटरमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करतात. पुण्यातील विविध चिकन विकणाऱ्या दुकानांना याच सेंटरमधून बॉयलर कोंबड्या पुरविल्या जातात. या मोठ्या चिकन सेंटरमध्ये फलटण येथून त्यांची कोंबड्यांची गाडी पुण्यात येते.
नेहमीप्रमाणे रविवारी रात्री हजारोंच्या संख्येने कोंबड्या घेऊन सेंटरची गाडी छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये आली आणि पार्किंग म्हणून चालकाने गाडी पार्किंगमध्ये पार्क केली. संबंधित टेम्पो चालकाने गाडी पार्क केली आणि झोपण्यासाठी तिथून निघून गेला. हीच संधी शोधत अज्ञाताने या गाडीतील तब्बल ८०० जिवंत कोंबड्या चोरल्या. झोप झाल्यानंतर टेम्पो चालक आले आणि त्यांनी गाडीमध्ये असलेल्या कोंबड्यांवर नजर फिरवली तर गाडीतून कोंबड्या गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ही बाब सबंधिताना सांगितली आणि थेट पोलिसात धाव घेतली.
प्रत्येक कोंबडीची किंमत सुमारे २०० रुपये असून, चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपयांच्या कोंबड्या चोरून नेल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पार्किंग मधून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world