जाहिरात

Pune Crime: पुणेकरांनो, जीममध्ये घाम गाळताय? बॉडी बनवण्याच्या नावाखाली जिवाशी खेळ; धक्कादायक प्रकार उघड

संबंधितांकडे औषध विक्रीचा परवाना नसतानाही ते हे इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Pune Crime: पुणेकरांनो, जीममध्ये घाम गाळताय? बॉडी बनवण्याच्या नावाखाली जिवाशी खेळ; धक्कादायक प्रकार उघड

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Pune News: जीममध्ये घाम गाळणाऱ्या पुणेकरांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरीरसौष्ठवासाठी तसेच नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बंदी असलेल्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीवर आंबेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत 50 इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, औषध परवाना नसताना धोकादायक इंजेक्शनची विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अथर्व इंद्रजित शिंदे (24), अविनाश शिवा बळुंगी (22), प्रदीप जितेंद्र हुंबरे (26), पियुष गणेश भरम (26) आणि लक्ष्मण परमेश्वर माने (36) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nashik News: 'भयावह चित्र, नगरसेविका म्हणून लाज वाटते...' राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा संताप, भाजपवर निशाणा

बंदी असलेल्या 'बॉडी बिल्डिंग' इंजेक्शनचा साठा जप्त

कात्रज - दत्तनगर रोडवरील आनंद दरबारजवळ सार्वजनिक रस्त्यावर 24 जुलैच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.  आरोपींकडून Mephentermine Sulphate Injection IP (Mephivan) या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. हे इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरणे धोकादायक असून त्याचा गैरवापर शरीरसौष्ठव आणि नशेसाठी केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. संबंधितांकडे औषध विक्रीचा परवाना नसतानाही ते हे इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 318/2026 नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 275, 278, 125 तसेच औषधे व प्रसाधने अधिनियम, 1940 मधील कलम 18(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी पथकासह कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

Political News: खळबळजनक! भाजप नेत्याचा आमदार निवासात संशयास्पद मृत्यू; 7व्या मजल्यावरुन पडून अंत

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com