यशपाल सोनकांबळे, पुणे:
Pune Shivajinagar Crime: 'तु खूप सुंदर दिसतेस' असं म्हणत डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यामधून समोर आली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली असून आरोपीचे संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
डीलिव्हरी बॉयचे संतापजनक कृत्य
डिलिव्हरी बॉयकडून तरुणीची छेड काढण्यात आल्याची खळबळजनक बातमी पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातून समोर आली आहे. 'तू खूप सुंदर दिसतेस' म्हणत पोर्टर अँपच्या डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपी CCTV कॅमेरात कैद झाला आहे.
VIDEO: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घराबाहेर गोळीबार; 2 राऊंड फायर, ठाण्यात खळबळ
शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोर्टर ॲपवरून सामान बोलवले होते. हे सामान घेण्यासाठी तरुणीने दरवाजा उघडला आणि पार्सल घेतलं. मात्र त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली. तरुणीने डिलिव्हरी बॉयला पाणी दिले. यावेळी डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला खूप सुंदर दिसतेस, असं म्हटलं. दरम्यान 6 मार्चला संध्याकाळी पाच वाजता सुमारास हि घटना घडली.
पोलिसात गुन्हा दाखल
तरुणीच्या घरीच ही घटना घडली आहे. यावेळी तरुणीच बाळ आणि सासू घरात होते. तिने घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला आणि त्यांनतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठले. श्रीधर कांबळे असं या संशयिताचे नाव आहे. सध्या याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ॲपमधील सगळे डिटेल्स पोलिसांना देण्यात आले असून तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीधर कांबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आता या संशयित आरोपीला अटक करणं हे पोलिसां पुढचं आव्हान असणार आहे.
Sindhudurg News: मोबाईलपेक्षा जीव स्वस्त, आईच्या नकाराचा राग; बर्थडे दिवशीच मुलाने आयुष्य संपवलं!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world