
Pune News: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्याचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे हे मुख्य आरोपी असून ते सध्या फरार आहेत. याच प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून मृत वैष्णवी हगवणे यांचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे पोलिसांंना शरण आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर सुशील हगवणे फरार झाले होते.
गेल्या सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.बावधन पोलिसांनी पहाटे कारवाई करत दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. घटनेनंतर दोघेही फरार झाल्याने तसेच गेल्या सात दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असल्याने संताप व्यक्त केला जात होता. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेली होती. अखेर या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
( नक्की वाचा : MHADA Lottery : म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरांची किंमत झाली कमी! वाचा किती होणार तुमचा फायदा? )
दरम्यान, याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. तसेच वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असल्याचे आरोप राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world