
Hindu Muslim unity : महाराष्ट्रात सध्या नेतेमंडळी धार्मिक, जातीय मुद्दे उकरून काढत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे. हिंदू संघटनांकडून वांरवार एका समाजाला टार्गेट केलं जात असल्याचं दिसून येत आहे. हे सर्व राजकीय पातळीवर सुरू असलं तरी प्रत्यक्षात हिंदू-मुस्लीम एकतेने भारतात नांदत आहेत. याचीच परिणीती पुण्य़ातील एका घटनेतून पाहायला मिळाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या पुण्यात रास्ता पेठेतील जयश्री किंकळे या महिलेच्या भावाचा मृत्यू झाला होता. ही महिला आपल्या भावासोबत राहत होती. वयाच्या 70 व्या वर्षी भावाचा मृत्यू झाला. कोणी नातेवाईक नसल्यामुळे काय करावं हे महिलेला कळत नव्हतं. या महिलेच्या मदतीला कुणीही आलं नाही. अखेर या महिलेच्या मदतीला पुण्यातील जावेद खान आणि मायकल साठे धावून आले.
नक्की वाचा - Malegaon News : गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलन, साध्वी प्रज्ञांना हिंदूवीर' पुरस्कार; उच्च न्यायालयाने काय सांगितलं?
जावेद खान यांनी रमजानचा महिना सुरू असताना कोणताही विचार न करता सर्व कामं बाजूला ठेवून मदतीसाठी पुढे आले आणि त्यांनी थेट त्या ज्येष्ठ भगिनीच्या मदतीसाठी धावले. जावेद खान यांनी प्रथम ससून रुग्णालयाचं शवगृह गाठलं, त्यानंतर मृतदेह सुपूर्द केल्यानंतर जावेद खान यांनी स्वतः हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केला. सध्या राजकारण्यांकडून हिंदू-मुस्लीम असे धार्मिक वाद अगदी कबरीतून उकरून काढले जात आहेत. त्यात पुण्यातल्या जावेद खान रमजानमध्ये दाखवलेली ही समतेची गुढी खरंच कौतुकाची बाब आहे.
उद्धव ठाकरेंकडून कौतुक...
हिंदू व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणारे पुण्यातील जावेद खान यांचं राज्यभरातून कौतुक केलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करून जावेद खान यांचं कौतुक केलं. त्याशिवाय सुषमा अंधारे यांनीही जावेद खान यांच्या कृतीचं कौतुक करीत राणेंना टोला लगावला आहे. कोणी कितीही हिंदू-मु्स्लीम केलं आणि इथली वीण उसवण्याचा प्रयत्न केला तरी ही माती इतकी कमजोर नाही की फुटीरतावादींच्या प्रयत्नांना खतपाणी घालेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world