जाहिरात
This Article is From Jun 29, 2025

Ajit Pawar: माझं ठरलं होतं, बंगला बांधल्याशिवाय..' अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितला लग्नाचा किस्सा

या निंबाळकर साहेबांनी मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केले," असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar: माझं ठरलं होतं, बंगला बांधल्याशिवाय..' अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितला लग्नाचा किस्सा

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंती निमित्त UPSC व MPSC मध्ये सारथी संस्थेमार्फत प्रायोजित यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळ्याला अजित पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या आणि सुनेत्रा पवार यांच्या लग्नाआधीचा एक खास किस्सा सांगितला, ज्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

सोमवारपासून पावसाळी अधिवेशन! हिंदी सक्ती, शक्तीपीठवरुन विरोधक घेरणार, 'हे' मुद्दे गाजणार

काय म्हणाले अजित पवार?

"अजित निंबाळकर हे पुण्याचे कलेक्टर असतानाचा हा काळ. 80 च्या दशकात सिमेंटचे मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज होते. या निंबाळकर साहेबांकडे सिमेंटचे परवाने द्यायची जबाबदारी होती. त्यावेळी मी यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं साहेब मी माझ्या काटेवाडीत घर बांधायला काढल आहे, मला सिमेंट पाहिजे. माझं ठरलं होतं की बंगला बांधल्याशिवाय लग्न करायचं नाही. बायकोला पत्र्याच्या घरात आणून काय करू मी तरी? या निंबाळकर साहेबांनी मदत केली आणि मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं घर बांधून झालं आणि मग मी लग्न केले," असं अजित पवार म्हणाले.

Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता

"पुण्यात मी सगळ्या शासकीय इमारती बांधत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना उत्तम इमारती बांधून देईल पण तुमच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवा. सगळी लोक लांब गावातून तुमच्याकडे येतात. कुणालाही काम न करता वापस पाठवू नका. सगळ्या लोकांना भेटा,  लोक तुमच्याकडे अपेक्षा घेऊन येतात त्या अपेक्षा पूर्ण करा," असा मोलाचा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी नव्या अधिकाऱ्यांना दिला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com