जाहिरात

Rain Alert for Konkan : कोकणात आज आणि उद्या पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

Konkan Rain : फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. 

Rain Alert for Konkan : कोकणात आज आणि उद्या पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग

फेंगल चक्रीवादळामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळानंतर आता कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणालाही वादळामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यां अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 व 4 डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार “यलो अलर्ट” जाहीर करण्यात आला आहे.

 (नक्की वाचा-  विधानसभा निवडणुकीनंतर आज मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान; काय आहे कारण?)

फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. 

( नक्की वाचा : महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न )

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या रिमझिम पावसाच्या तुरळक सरी बरसतील. 3 आणि 4 डिसेंबरला पावसाचा जोर वाढेल. विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. 5 डिसेंबरला पुन्हा पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

चंद्रपुरात फेंगलचा शेतकऱ्यांना फटका

फेंगल चक्रीवादळाचा शेतकरी संकटात सापडले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरीप पाऊस पडल्याने काही ठिकाणी नुकसान झालं आहे. शेतात कापूस, तुळ, हरबरा पिक आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूळ पिकावर संकट ओढवले, तुळीला फुलोरा आला आहे. पावसामुळे फुलोरा गळण्याचा धोका उद्भवाला असून अळीचा धोका वाढला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com