जाहिरात

Raj Thackeray: 'बाळासाहेबांचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची...' राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Raj Thackeray: 'बाळासाहेबांचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची...' राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

Raj Thackeray Post On Balasaheb Thackeray Death Anniversary:  शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. हिंदुत्वाचा धगधगता अग्निकुंड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क परिसरातील स्मृतीस्थळावर दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन केले. आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज ठाकरे यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.  

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. 

Amit Thackeray: अमित ठाकरेंविरोधात पहिला गुन्हा दाखल; नवी मुंबईत पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांनी...

पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

तसेच ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही! फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com