18 minutes ago

शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा होणार आहे.  ठाकरे बंधूंचा विजय मेळावा उद्या वरळी डोममध्ये पार पडणार आहे. सध्या या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. 8 हजार क्षमतेचा हा डोम (Worli Dome) सजवला जात असून, व्हीआयपी रांगांचीही आखणी केली जात आहे. आज ठाकरे बंधू काय बोलणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज नेमकी भाषणं होणार असल्याची माहिती आहे. यावेळी प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राज ठाकरे, आणि उद्धव ठाकरे यांचीच भाषणं होणार आहे. 

Jul 05, 2025 16:17 (IST)

Live Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड

Live Update:  बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड करण्यात आली. या कारखान्याची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यामध्ये अजित पवार यांच्या पॅनलनं मोठा विजय मिळवला होता. 

Jul 05, 2025 13:31 (IST)

Live Update : माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो, कार्यालय फोडल्यानंतर सुशील केडियांनी मागितली माफी

माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो, कार्यालय फोडल्यानंतर सुशील केडियांनी मागितली माफी

Jul 05, 2025 13:00 (IST)

Live Update : आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार आहोत - उद्धव ठाकरे

आज आमच्या भाषणांपेक्षा आम्हा दोघांचे एकत्र दिसणे गरजेचे आहे.  आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी. मधल्या काळात मी आणि राज, आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्ट्यांचा अनुभव घेतलाय... वापरायचं आणि फेकायचं. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार आहोत.  - उद्धव ठाकरे

Jul 05, 2025 12:47 (IST)

Live Update : तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच -  उद्धव ठाकरे

Advertisement
Jul 05, 2025 12:46 (IST)

Live Update : तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर - राज ठाकरे

कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही. हे सगळं अचानक कुठून आले हे कळालेच नाही. कशासाठी हिंदी ? कोणासाठी हिंदी ? लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती करताय? कोणाला काही विचारायचे नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.  

Jul 05, 2025 12:45 (IST)

Live Update : राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा...

1999 साली शिवसेना-भाजपचे सरकार येणार की नाही अशी परिस्थिती होती.  शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या वादामध्ये काहीच होत नव्हतं. एकेदिवशी मी मातोश्रीवर बसलो होतो, दोन गाड्या लागल्या. साडेतीन चारच्या सुमारास. प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली आणि म्हणाली की बाळासाहेबांना भेटायचे आहे. अर्जंट आहे असं म्हणाले. ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय निकाली लागला आहे. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे असे दोन्ही बाजूने ठरल्याचा ते निरोप घेऊन आले होते. बाळासाहेबांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला म्हटले की त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. - राज ठाकरे

Advertisement
Jul 05, 2025 12:01 (IST)

Live Update : अखेर तो क्षण आला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र...

अखेर तो क्षण आला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र...

Jul 05, 2025 11:57 (IST)

Live Update : राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बैठक

राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे...

Advertisement
Jul 05, 2025 11:56 (IST)

Live Update : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित बैठक...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित बैठक...

Jul 05, 2025 11:56 (IST)

Live Update : ठाकरेंचा जल्लोष मेळावा पाहा Live

Jul 05, 2025 11:52 (IST)

Live Update : महाराष्ट्र माझा गीताने कार्यक्रमाला सुरुवात...

महाराष्ट्र माझा गीताने कार्यक्रमाला सुरुवात...

Jul 05, 2025 11:50 (IST)

Live Update : रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे सभास्थळी दाखल...

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपूत्र तेजस ठाकरे देखील सभास्थळी दाखल...

Jul 05, 2025 11:50 (IST)

Live Update : रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे सभास्थळी दाखल...

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपूत्र तेजस ठाकरे देखील सभास्थळी दाखल...

Jul 05, 2025 11:49 (IST)

Live Update : भगव्या शालीत असणारे राज ठाकरे आज निळ्या शालीत...

राज ठाकरेंनी निळ्या रंगाची शाल परिधान केली आहे. ऐरवी भगव्या शालीत असणारे राज ठाकरे आज निळ्या शालीत दिसत आहेत...

Jul 05, 2025 11:43 (IST)

Live Update : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल...

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल...

Jul 05, 2025 11:39 (IST)

Live Update : सुप्रिया सुळे डोम परिसरात दाखल...

घरापासून डोमजवळ यायला दहा मिनिटं लागतात आता एक तास लागला. ठाकरे विजयी मेळाव्यात अभूतपूर्व गर्दी - सुप्रिया सुळे

Jul 05, 2025 11:36 (IST)

Live Update : सुप्रिया सुळे वरळी डोममधील सभास्थळी दाखल...

सुप्रिया सुळे वरळी डोममधील सभास्थळी दाखल...

Jul 05, 2025 11:21 (IST)

Live Update : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना..

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना..

Jul 05, 2025 11:04 (IST)

Live Update : गुंतवणूकदार सुशील केडियाचे वरळीतील कार्यालय फोडले, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Live Update : गुंतवणूकदार सुशील केडियाचे वरळीतील कार्यालय फोडले, मनसे कार्यकर्त्यांचा संताप

Jul 05, 2025 10:53 (IST)

Raj Thackeray Uddhav Thackeray Live: वरळी डोमबाहेर अभूतपूर्व गर्दी, राज्यभरातून मराठी एकवटले

वरळी डोमबाहेर मराठी प्रेमींची तोबा गर्दी

डोममधील आसन व्यवस्था फूल असल्याने कुणालाही आत सोडलं जात नाही

Jul 05, 2025 10:45 (IST)

Live Update : संजय राऊत यांचे वरळीतील डोम येथील मेळाव्यास्थळी आगमन...

संजय राऊत यांचे मेळाव्यास्थळी आगमन...

Jul 05, 2025 10:19 (IST)

Live Update : 'आम्ही सोबत आहोत', विजय वडेट्टीवारांच्या ट्विटने काँग्रेसची भूमिका स्पष्ट?

Jul 05, 2025 10:10 (IST)

Live Update : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच ताफ्यातून मेळाव्यात सामील होणार

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच ताफ्यातून मेळाव्यात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

Jul 05, 2025 10:00 (IST)

Live Update : अभिनेता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव मेळाव्यास्थळी दाखल..

अभिनेता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव मेळाव्यास्थळी दाखल..

Jul 05, 2025 09:26 (IST)

Live Update : हर्षवर्धन सपकाळ विजयी सभेकडे पाठ फिरवणार? पक्ष नेतृत्वाकडून सभेपासून दूर राहण्याचा आदेश

हर्षवर्धन सपकाळ विजयी सभेकडे पाठ फिरवणार? पक्ष नेतृत्वाने विजयी सभेपासून अंतर राखण्याचा आदेश दिल्याची माहिती. विजय सभा महा विकास आघाडीच्या फुटीची सुरुवात ठरण्याची तज्ञांनी वर्तवली शक्यता

Jul 05, 2025 08:58 (IST)

Live Update : शिवसेना मनसेचा जल्लोष मेळाव्याची प्रत्येक अपडेट पाहा Live

Jul 05, 2025 08:57 (IST)

Live Update : 'वाजत गाजत या' मनसेतून ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांच कार्यकर्त्यांना आवाहन

'वाजत गाजत या'  मनसेतून ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांच कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबईच्या मेळाव्याला रवाना होताना राज्यभरातील कार्यकर्त्यांना वसंत मोरे यांनी घातली भावनिक साद 

मराठी माणसांच्या मनातील आजचा आनंदाचा दिवस 

वीस वर्षाच्या कालावधीनंतर दोन्ही बंधू एकत्रित येत आहेत ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब 

मी दोन्ही पक्षात काम केलं पण या दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर मी कधीच पाहिलं नाही माझ्यासाठी हा क्षण वेगळा असेल 

Jul 05, 2025 08:57 (IST)

Live Update : पुण्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्रित मुंबईकडे रवाना

पुण्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्रित मुंबईकडे रवाना 

आजचा मेळावा नव्या युतीची नांदी म्हणत पुण्यातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित मुंबईकडे रवाना 

मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईकडे एकत्रित प्रवास 

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम समोरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

आमच्यासाठी हा आजचा आनंदाचा दिवस 

भविष्यात मोठे काहीतरी आम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसाचा आनंद वेगळा 

पुण्यातील सर्व स्थानिक नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास

Jul 05, 2025 08:51 (IST)

Live Update : अंधेरी विधानसभेमध्ये ठाकरे मनसे कार्यकर्ते विजय मेळाव्यासाठी रवाना

हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र येत असून, मराठी माणसांच्या एकजुटीसाठी वरळीतील विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू हाक देणार आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे  पदाधिकारी मेळाव्यासाठी रवाना होत आहेत , कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता मराठी अस्मितेसाठीचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ऐतिहासिक ठरणार आहे.

Jul 05, 2025 08:50 (IST)

Live Update : ठाण्यात शिवसैनिक व मनसैनिक जमायला सुरुवात..

ठाण्यात शिवसैनिक व मनसैनिक जमायला सुरुवात..

ठाणे शहराच्या वेशीवर राज उद्धव यांचा विजय असो मराठी भाषेचा विजय असो कार्यकर्त्यांकडून लगावण्यात येत आहेत घोषणा..

Jul 05, 2025 08:10 (IST)

Live Update : मुंबईच्या दादर परिसरात पुन्हा एकदा लागले ठाकरे यांना डिवचणारे बॅनर

मुंबईच्या दादर परिसरात पुन्हा एकदा लागले ठाकरे यांना डिवचणारे बॅनर

बॅनरवर "जलेबी ना फाफडा ऊद्धव ठाकरे आपडा" असा बॅनरवर ऊल्लेख 

आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना तसेच आमच्याकडून गुजराती व्यापाऱ्यांना झालेली मारहाण आणि काल एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र सोबत जय गुजरात म्हटल्यानंतर ठाकरेंवर अनेक आरोप केलेयत, मनपा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा केलाय आरोप

मातोश्री आणि दादर परिसरात सध्या निनावी बॅनर्सची जोरदार चर्चा

Jul 05, 2025 08:09 (IST)

Live Update : मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा; मुंबईत बॅनरबाजी

हिंदी सक्तीचा महायुती सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधू आणि मराठी माणसे आज एकत्र येत विजय मेळावा मुंबईत घेणार आहे 

या विजय मेळावा मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेसच्या वतीने देखील पाठिंबा दर्शविण्यात आल्याचे बॅनर वर दिसून येत आहे..

मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा 

ठाकरेंबाबतचे बॅनर मुलुंड टोलनाक्यावर झळकत आहेत

दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पार्टी कडून शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील

आदित्य आणि अमित ठाकरे यांचेही बॅनरवर फोटो.... 

Jul 05, 2025 07:45 (IST)

Live Update : पुण्यातून मनसैनिक मुंबईकडे विजयी मेळाव्यासाठी रवाना

पुण्यातून मनसैनिक मुंबईकडे रवाना 

मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला मनसैनिक पुण्यातून मोठ्या संख्येने रवाना 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी एकत्रित मुंबईकडे

Jul 05, 2025 07:44 (IST)

Live Update : मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागले

मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागलेत. विशेष म्हणजे या बॅनरवरील फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांनी राज-उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि वरूण सरदेसाई यांनी हा बॅनर लावला आहे. 

Jul 05, 2025 07:44 (IST)

Live Update : मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागले

मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागलेत. विशेष म्हणजे या बॅनरवरील फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांनी राज-उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि वरूण सरदेसाई यांनी हा बॅनर लावला आहे. 

Jul 05, 2025 07:43 (IST)

Live Update : नाशिकमध्ये मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी उभारली विजयाची गुढी

मुंबईत विजयी मेळाव्याला निघण्यापूर्वी नाशिकमध्ये मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी उभारली विजयाची गुढी.. शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते एकच ब्रँड ठाकरे ब्रँडची घोषणाबाजी करत मुंबईकडे रवाना..