
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित मेळावा सुरू आहे. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा वरळी डोममध्ये पार पडत आहे. दरम्यान भाषणाची सुरुवात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्या नावापासून केली. राज ठाकरे यावेळी म्हणाले, मोर्चा निघायला पाहिजे होता. मराठी माणून कसा एकवटतो, हे कळलं असतं. मात्र मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा खरं शिवतीर्थावर व्हायला हवा होता. मात्र पावसाळ्यात अशी परवानगी मिळत नाही.
मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं. (Raj Uddhav Thackeray Alliance) कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज 20 वर्षांनी मी आणि उद्धव एका व्यासपीठावर येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलंय, असंही राज ठाकरे म्हणाले. कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. महाराष्ट्राकडे कोणीही वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही. हे सगळं अचानक कुठून आले हे कळालेच नाही. कशासाठी हिंदी ? कोणासाठी हिंदी ? लहान मुलांवर हिंदीची जबरदस्ती करताय? कोणाला काही विचारायचे नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर, असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.
नक्की वाचा - Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
अजित भुरे यांनी मेळाव्याचं सूत्रसंचालन केलं. यावेळी रासपचे महादेव जानकर, शेकापचे जयंत पाटीलही मेळाव्याला उपस्थित होते. राजकीय कार्यक्रमाला फिल्मी टच दिल्याचं पाहायला मिळालं. राज आणि उद्धव ठाकरेंचे आगमन होण्यापूर्वी डोममध्ये अंधार करण्यात आला होता. यानंतर मोबाईलचे हजारो लाईट पेटले होते. व्यासपीठावर येताच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना आलिंगन दिलं. दोघांनी एकत्रितपणे शिवाजी महाराजांना हार घातला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world