जाहिरात

"खळं लुटणारा मारकडवाडी गावात आला", सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका

Sadabhau Khot : तुमची पोरगी निवडून आली, रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगलं होतं. उद्धव ठाकरे ते कळंलच नाही. ते मातोश्रीत बसून होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्यासोबत घेतलं, असा घणाघात केला. 

"खळं लुटणारा मारकडवाडी गावात आला", सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर नाव न घेता टीका

सोलापूरच्या मारकडवाडीतील सभेतून भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवर सडकून टीका केली. नकला करत सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. 

सोलापूरच्या मारकडवाडी गावातील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत ईव्हीएमला जोरदार विरोध दर्शवला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मारकडवाडीत जात EVM ला विरोध दर्शवला. हे प्रकरण तापलेलं असताना आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि माजी आमदार राम सातपुते यांनी मारकडवाडीत सभा घेतली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

खळं लुटणारा गावात आला

सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मारकडवाडीने इतिहास रचला. देशभरात मारकडवाडीची चर्चा होत आहे. खळं लुटणारा गावात आला. मारकडवाडी गावातील लोक बहाद्दर आहेत, भुलवत भुलवत गावात आणलं, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शरद पवारांवर केली. 

देशातला मोठा चोर राहुलबाबा देखील मारकडवाडीत येणार आहे, असं कळतंय. पवार साहेब हुशार आहेत. त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण हरायला का लागलो. म्हणून पहिल्यांदा ते छोट्या गावात येऊन बसले. 50-60 वर्षांत पहिल्यांदा त्यांची राजकीय हत्या झाली, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

(नक्की वाचा-  सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं; पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप, संसदेत उमटणार पडसाद? )

पराभव होत आहे म्हणून ईव्हीएमला विरोध

ईव्हीएम मशीन यांनीच आणलं आणि हेच त्याला विरोध करत आहेत. पराभव होत आहे, म्हणून हे ईव्हीएमला विरोध करत आहे. बॅलेट पेपर मतदान झालं तर एकदोन पेपर गिळता येतात. मात्र ईव्हीएम मशीन गिळता येत नाही. म्हणून यांना निवडणूक बॅलेट पेपर हवी आहे. पवार साहेबांना झोप लागत नाही. 60-70 वर्ष सत्ता भोगली आता निवांत राहिलं पाहिजे. मात्र यांना सत्तेची सवय लागली आहे, लोकांना गुलाम बनवून त्यांच्याकडे बघण्याची सवय यांना लागली आहे, अशी टीका देखील खोत यांना शरद पवारांवर केली. 

देवाभाऊने राष्ट्रवादीची लुटारुंची टोळी गाडली

पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप महाराष्ट्राच्या मातीत जन्मला. राष्ट्रवादी गुंडांची आणि लुटारुंची टोळी आहे. या टोळीला गाडण्याचं काम देवाभाऊने केलं. देवेंद्र फडणवीस नावाचा वस्ताद महाराष्ट्राच्या मातीत आला. बारामतीचा तो वस्ताद नाही दुधी भोपळा होता, अशी टीका देखील सदाभाऊ खोत यांना शरद पवारांवर नाव न घेता केली. 

नक्की वाचा - पुणे हादरलं! आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा मृतदेह सापडला 

तुमची पोरगी निवडून आली, रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगलं होतं. उद्धव ठाकरे ते कळंलच नाही. ते मातोश्रीत बसून होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्यासोबत घेतलं, असा घणाघात केला. 

बॅलेट पेपरवर घोटाळा करता येतो त्यांना लक्षात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील यांनी पाडलं. ईव्हीएम मशीनचा कायदा लोकसभेत केला, तेव्हा त्यांचा सरकार केंद्रात होतं. हे आम्हाला संविधान पाळायला सांगतात. मात्र मारकडवाडी गावानं लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे, असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com