जाहिरात
Story ProgressBack

सांगलीमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

Sangali Accident: सांगलीमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाला झालेल्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Time: 2 min
सांगलीमध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

Sangali Accident: सांगली जिल्ह्यातील जांभूळवाडीजवळ क्रुझरजीप आणि खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात क्रुझरजीपमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांनी जागीच जीव गमावला तर तर दोन जण जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेले जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी (17 एप्रिल) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास विजापूर- गुहागर महामार्गावर ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला 

कर्नाटकातील बागलकोट तालुक्यातील जमखंडी परिसरातून क्रुझरजीपमधून लग्नाचे वऱ्हाड सांगलीतील सावर्डेच्या दिशेने प्रवास करत होते. वऱ्हाडसाठी दोन क्रुझर आणि नवरी मुलगी स्वीफ्ट कारने प्रवास करत होती. वऱ्हाडाच्या या वाहनांना विजापूर-गुहागर महामार्गावरील जांभूळवाडी येथे भीषण अपघात झाला. यावेळेस मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला क्रुझरजीपचीन मागील बाजूने जोरदार धडक बसली आणि अपघातानंतर क्रुझरने पेट घेतला.

तीन जणांची प्रकृती गंभीर

या भीषण अपघातावेळेस क्रुझरजीपमध्ये 14 प्रवासी होते. यातील पाच जणांनी जागीच जीव गमावला, तर जखमींना हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना दोन जणांचा वाटेतच मृत्यू झाला. तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह अग्निशमन दल आणि कवठेमहांकाळ-जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व त्वरित बचाव- मदतकार्यास सुरुवात केली. दरम्यान रात्रीच्या वेळेस बचावकार्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

आणखी वाचा 

लेकीसाठी आई मैदानात, अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, नक्की काय घडलं?

बायकोचं इन्क्रिमेंट होत नाही म्हणून संतापला नवरा, रागाच्या भरात बॉसवरच केला हल्ला

अल्पवयीन भाच्यासोबतच्या संबंधातून आत्या गर्भवती; कोर्टाचा मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination