जाहिरात

Thackeray Brothers: ठाकरे बंधूंची 20 वर्षांनंतर झालेली युती तुटणार? महापालिका निकालानंतरची रणनीती कमी पडली?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू असताना दोन मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे उद्धव सेनेच्या दोन नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून चक्क मनसेमध्ये प्रवेश केला.

Thackeray Brothers: ठाकरे बंधूंची 20 वर्षांनंतर झालेली युती तुटणार? महापालिका निकालानंतरची रणनीती कमी पडली?

Thackeray Brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर राज्याच्या राजकारणात 'ठाकरे' बंधूंच्या युतीबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीपूर्वी "एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी" अशी घोषणा करणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षांच्या भूमिका निकालानंतर मात्र टोकाच्या वेगळ्या दिशांना जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवलीतील घडामोडींमुळे तर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची रणनीती निकालांनंतर कोलमडताना दिसत आहे. ज्या शिंदे सेनेविरोधात राज ठाकरेंनी टोकाचा प्रचार केला, त्याच शिंदे सेनेला कल्याण-डोंबिवलीत मनसेने पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

(नक्की वाचा-  KDMC News: अनाकलनीय! महायुतीला स्पष्ट बहुमत; मग शिवसेनेने मनसेचा पाठिंबा का घेतला? वाचा Inside Story)

कल्याण-डोंबिवलीतील राजकीय भूकंप

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू असताना दोन मोठ्या घटना घडल्या. एक म्हणजे उद्धव सेनेच्या दोन नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून चक्क मनसेमध्ये प्रवेश केला. ज्या एकनाथ शिंदेंवर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली होती, त्यांच्याच पक्षाला (शिंदे सेना) मनसेने महापौरपदासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.

विदर्भातही फाटाफूट

केवळ कल्याणमध्येच नव्हे, तर विदर्भातही उद्धव सेनेला मोठे खिंडार पडताना दिसत आहे. अमरावती आणि अकोला येथे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे निकालानंतर रणनीती ठरवण्यात ठाकरे बंधू कमी पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(नक्की वाचा-  KDMC Election 2026 "शिंदे गट म्हणजे MIM"; मनसेच्या पाठिंब्यानंतर राऊतांचा संताप अनावर, राज ठाकरेंना दिला सल्ला)

संजय राऊत आक्रमक

कल्याणमधील या प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. "मी राज ठाकरेंशी बोललो आहे. त्यांनी सांगितले की, ही त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही," असे राऊत यांनी स्पष्ट केले. जे लोक सोडून जात आहेत, त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी देऊ शकत नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. आमच्यासाठी शिंदे सेना म्हणजे एमआयएम (MIM) आहे. त्यांच्याशी कोणतेही राजकीय संबंध ठेवायचे नाहीत, हे आमचे धोरण स्पष्ट आहे," असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com