जाहिरात

Greta Karpe: सांगलीच्या ग्रेटाचा राज्यात डंका! राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

ग्रेटाला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी कराटे क्लास शोधायला सुरुवात केली. त्यांच्या घराच्या जवळच जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या कराटे क्लासची माहिती त्यांना मिळाली.

Greta Karpe: सांगलीच्या ग्रेटाचा राज्यात डंका! राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक

गुरु दळवी, प्रतिनिधी:

Greta Karpe Gold Won Gold Medal:  छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल गारखेडा स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्टस स्पर्धेत ग्रेटा महेश कर्पे हिने सुवर्णपदक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले. ग्रेटा ही मूळची आंबोली (बाजारवाडी) येथील असून सध्या सांगली येथे वास्तव्यास आहे. तिच्या या यशामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ​ही स्पर्धा शस्त्रांग मार्शल आर्टस महाराष्ट्र राज्य संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन राज्य संघटना प्रमुख मिलिंद काटमोरे यांनी केले होते. ग्रेटाने 'एअर शिल्ड गर्ल्स' गटात आपली कौशल्याची चुणूक दाखवत प्रथम क्रमांक पटकावला.

सांगलीच्या ग्रेटाने पटकावले सुवर्णपदक...

​ग्रेटा सांगली येथील जिद्द स्पोर्टस फाऊंडेशनची खेळाडू आहे. तिला सांगली जिल्हा अध्यक्षा काजल लोंढे, सचिव प्रथमेश लोंढे, ग्रामीण सचिव पारस माने, तासगाव तालुका प्रमुख शुभम लांडगे, शितल पारसे, सुशांत दुधाळ, श्रेया कदम आणि सुजाता दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिचे वडील महेश कर्पे व आई स्वाती कर्पे यांचे तिला मोलाचे प्रोत्साहन मिळाले. ग्रेटाच्या या यशाबद्दल आंबोली ग्रामस्थांसह विविध स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.  अवघ्या सहा वर्षांच्या ग्रेटा महेश कर्पे या चिमुरडीने तिच्या कर्तृत्वाचा डंका राज्यभरात वाजविला आहे.

Sandeep Deshpande: मनसेमध्ये नाराज, संतोष धुरींपाठोपाठ भाजपमध्ये जाणार? अखेर संदीप देशपांडे बोलले!

महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणेच्या सांगलीतील बालक मंदिरमध्ये ग्रेटा मोठ्या गटात शिकतेय. वडील महेश मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीचे. नोकरीच्या निमित्ताने सांगलीत राहतात. आपल्या मुलीने स्वसंरक्षणाचे धडे लहानपणापासूनच गिरवावेत, अशी महेश आणि आई स्वाती यांची इच्छा होती. त्यानुसार ग्रेटाला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी कराटे क्लास शोधायला सुरुवात केली. त्यांच्या घराच्या जवळच जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या कराटे क्लासची माहिती त्यांना मिळाली.

मे 2025 मध्ये त्यांनी ग्रेटाचे क्लासमध्ये अ‍ॅडमिशन केले. क्लासचे प्रशिक्षक प्रथमेश लोंढे आणि काजल लोंढे यांनी ग्रेटाची प्रगती पाहून तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरविण्याचे ठरविले. सध्या कराटेतील ऑरेंज बेल्ट मिळवलेल्या ग्रेटाला सुरुवातीला त्यांंनी 4थ्या इन्व्हिटेशनल कराटे चॅम्पियनशीपमध्ये उतरविले. त्यात तिने काता प्रकारात रौप्यपदक आणि कुमिथेमध्ये कांस्यपदक मिळवले. 

त्यानंतर सांगली जिल्हास्तरीय प्रथम शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत तिने रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर तिच्या प्रशिक्षकांनी तिला राज्यस्तरीय स्पर्धेत उतरवायचे ठरवले. स्पर्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. चिमुरड्या ग्रेटाला एवढ्या लांब कसे पाठवायचे, असा प्रश्न आई-वडिलांसमोर होता. पण लोंढे सर आणि मॅडम यांचा मात्र ग्रेटावर विश्वास होता. त्यांनी सांगितलं, ग्रेटा या स्पर्धेत एखादं पदक नक्कीच मिळवेल. आम्ही सगळे आहोत. काळजी करू नका. 3 व 4 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा झाल्या.

Nagpur News: प्रशासनाचा हलगर्जीपणा! एकाच वेळी 80 नागरिक रुग्णालयात, अख्खं गाव भयभीत; असं काय घडलं?

ग्रेटाने असाच नावलौकिक करावा...

या स्पर्धेत तिने चमकदार कामगिरी करून एअर शिल्ड गर्ल्स गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि तिच्या प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविला. या यशाबद्दल तिचा शाळेत सत्कारही करण्यात आला. मुख्याध्यापिका स्मिता जोशी आणि वर्गशिक्षिका शीतल जवळेकर यांनी तिला पुष्पगुच्छ,  देऊन सत्कार केला. ग्रेटाचे आई-वडील सांगतात, ती कराटे शिकायला जात होती तेव्हा तिने कुठल्याही परिस्थितीत स्वत:चं संरक्षण करायला शिकावं, इतकीच आमची अपेक्षा होती. मात्र तिच्या प्रशिक्षकांनी दाखविलेला विश्वास, तिची मेहनत, सराव याच्या जोरावर तिने ही कामगिरी केली. तिने यापुढेही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी आणि फक्त आंबोली, सांगलीचाच नव्हे तर संपूर्ण राज्याचा आणि भविष्यात देशाचा नावलौकिक करावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com