Nagpur Water contamination: नागपुरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे तब्बल ८० नागरिकांची प्रकृती खालावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे गावकऱ्यांवर आजाराची वेळ ओढवली असून, यात लहान मुले आणि वृद्धांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावनेर तालुक्यातील खैरी ढालगावमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी गावात मुख्य पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली होती. एका इलेक्ट्रिक पोल वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या दाबामुळे ही पाइपलाइन फुटल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे सुरुवातीला गांभीर्याने पाहिले नाही.
Chhattisgarh News: नक्षलवादी चळवळ खिळखिळी! 65 लाखांचे बक्षीस असलेले 65 माओवाद्यांचे आत्मसमर्पण
फुटलेल्या पाइपलाइनमधून दूषित पाणी नळावाटे थेट घराघरांत पोहोचले. हे पाणी प्यायल्याने ४ जानेवारीपासून नागरिकांना पोटदुखी, हगवण आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावातच तात्पुरता वैद्यकीय कॅम्प सुरू केला आहे. पहिल्या दिवशी ६५ आणि दुसऱ्या दिवशी २५ रुग्णांची नोंद झाली.
नागरिकांचा संताप
प्रशासनाच्या मते, पाइपलाइन ४ जानेवारीलाच दुरुस्त करण्यात आली होती आणि सद्यस्थितीत कोणताही रुग्ण गंभीर नाही. तरीही, खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी मात्र ग्रामपंचायत प्रशासनावर संताप व्यक्त केला असून, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.
Nagpur Crime: तीन मित्र, दारुची नशा अन् मैत्रिणीवरुन वाद, पुढे जे घडलं.. नागपुरात खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world