- अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची मागणी केली आहे
- अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची ऑफर दिली आहे
- दानवे यांच्या मते शिवसेना एकच आहे आणि उद्धव ठाकरे त्याचे नेतृत्व करतात, तर दुसरा गट गद्दारांची गँग आहे
दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहीजेत अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट ऑफर दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी. त्यातून नक्कीच मार्ग निघेल असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
अंबादास दानेवे यांनी पुढे बोलताना सांगितलं की शिवसेना दोन नाहीत. शिवसेना ही एकच आहे. ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरे जे आहेत ती गँग आहे. ती गद्दारांची गँग असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. शिवाय या गद्दार गँग पैकी कोणाला ही एकी हवी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर बोललं पाहीजे असं ही ते म्हणाले. बोलले तर नक्कीच तोडगा निघेल असं ही ते म्हणाले.
शिवसेना शिंदे गटातील अनेकांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात खालच्या पातळीवरची टीका केला होती. याबाबत ही दानवे बोलले. राजकारणात टीका ही होत असते. त्यामुळे त्याचा राग राजकारणात धरला जात नाही. पण टीका करणे वेगळे आणि नमकहरामी करणं वेगळं आहे. असं सांगत त्यांनी शिंदेंच्या सेनेला टोला लगावला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर यावं आणि चर्चा करावी. तसं झाल्यास चर्चा पुढे जावू शकते असं ही ते म्हणाले.
नक्की वाचा - Big News: भाजपला मोठा धक्का बसणार? बडा नेता बंडाच्या तयारीत, स्वत:चा पक्ष काढणार
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणात अब्दुल सत्तार यांनी भाजपवर थेट टीका केली आहे. शिवसेनेला भाजप संपवत आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेनं एकत्र आलं पाहीजे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला अंबादास दानवे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर दानवे आणि सत्तार यांची भेट ही झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world