Satara News : सातारा जिल्ह्याचं नाव बदलणार? DCM एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महाबळेश्वर व पाचगणीसारख्या पर्यटन स्थळांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी होम स्टे अशा पद्धतीने प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला जाईल, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुजीत आंबेकर, सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याचं नाव बदललं जाण्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. साताऱ्याला 'राजधानी सातारा' संबोधले जाते. मात्र आता जिल्ह्याचे अधिकृतरित्या नामकरण 'राजधानी सातारा' असं झालं पाहिजे अशी अनेक सातारकरांची इच्छा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता,  "महायुती सरकार जनतेचं, सर्वसामान्यांचं सरकार आहे. जनतेची इच्छा असेल तर ते नक्कीच पूर्ण केले जाईल. मी याबाबत माहिती घेतो", असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. महाबळेश्वर येथील दरे तांब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"महाबळेश्वर व पाचगणीसारख्या पर्यटन स्थळांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी होम स्टे अशा पद्धतीने प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला जाईल. पर्यटन वाढीसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्याचा पाठपुरावा करण्यात निश्चितच यश येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री हे महायुतीचे असून सर्वजण प्रभावीपणे काम करत आहेत", असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

(नक्की वाचा- Exclusive : "दाक्षिणात्य कर्मचाऱ्यांना प्राध्यान्य", Infosys कंपनीवर गंभीर आरोप करत IT इंजिनिअरचा राजीनामा)

"संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपींना फाशीसाठी सरकार प्रयत्नशील"

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईबाबत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "आरोपींना सोडणार नाही. संतोष देशमुख यांची झालेली हत्या माणुसकीला काळीमा फासणारी आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. आरोपींना अटक केली आहे. एकही आरोपी सुटणार नाही. फास्टट्रॅक कोर्टात ही केस चालेल. कुणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. संतोष देशमुखांची जशी हत्या झाली आहे, आरोपींना देखील तशीच कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

(नक्की वाचा-  Exclusive Interviews : बीडमधील वाढत्या गुन्हेगारीचा पुण्याlतील विद्यार्थ्यांना मनस्थाप; तरुणांनी रडून सांगितले अनुभव)

उद्धव ठाकरेंवर टीका

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक राज्य सरकारने बांधलेले आहे. त्यामुळे ते कुणाच्या व्यक्तिगत मालकीचे नाही", असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला. "जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे. त्यामुळे आमची महायुती मजबूत व भक्कम झालेली आहे", असं उत्तर देखील त्यांनी विरोधकांना दिलं आहे. 

Topics mentioned in this article