जाहिरात

Satara Doctor Case: तरुणीच्या हातावर सुसाईड नोट नव्हती? पोस्टमार्टम रुममध्येच.. फलटण प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट

Phaltan Doctor Suicide Case: गोपाळ बदने यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने बनकर आणि PSI गोपाल बदने दोघांनाही दोन दिवसाची आणखी पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Satara Doctor Case: तरुणीच्या हातावर सुसाईड नोट नव्हती? पोस्टमार्टम रुममध्येच.. फलटण प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट

राहुल तपासे, प्रतिनिधी:

Satara Doctor Suicide Case:  सातारा जिल्ह्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने हातावर दोन आरोपींची नावे लिहली होती ज्यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी संशयित आरोपी प्रशांत बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने बनकर आणि PSI गोपाल बदने दोघांनाही दोन दिवसाची आणखी पोलिस कोठडी सुनावली आहे. 

'सरकारी पक्षाचा युक्तिवाद'

सरकारी वकील क्षमा बांदल यांनी पोलिसांची बाजू मांडताना तपास पूर्ण करण्यासाठी आरोपींच्या ५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.डिजिटल पुराव्यांची चौकशी: पीएसआय गोपाळ बदने यांच्या घराची झडती घेतली असता तीन पेन ड्राईव्ह (Pen Drives) जप्त करण्यात आले आहेत. या डिजिटल पुराव्यांची चौकशी होणे अद्याप बाकी आहे.

Satara Doctor Suicide Case: मी लवकरच...मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबीयांना DCM अजित पवारांचं मोठे आश्वासन

तसे पीएसआय बदने पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करत नाही. मृत डॉक्टर महिलेने आपल्या हातावर या दोघांची नावे लिहिली होती, त्यामुळे त्यांची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. हातावर मिळालेले हस्ताक्षर मृत व्यक्तीचे नसले तरी, हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत अधिक तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे.आरोपी प्रशांत बनकर यांचा लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यात फोटो, व्हिडिओ आणि स्क्रीन शॉट मिळाले आहेत. या पुराव्यांवरून अधिक तपास करण्यासाठी बनकर यांच्या कोठडीत वाढ करावी.

आरोपींच्या वकिलांचा प्रतिवाद

आरोपी गोपाळ बदनेचे वकील अॅड. राहुल धायगुडे यांनी पोलिसांच्या मागणीला विरोध करत जोरदार युक्तीवाद करत सुसाईड नोटवरुन खळबळजनक दावा केला. हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीच्या हातावर कोणीही 'सुसाईड नोट' बघितली नाही, पण पोस्टमार्टम (Post Mortem) रूममध्ये हातावर सुसाईड नोट असल्याचे दिसून आले, हे कसे शक्य आहे? मुळात सुसाईड नोटमधील अक्षर हे डॉक्टर तरुणीचे नाही, असे त्यांचे नातेवाईक म्हणत आहेत. मग, आरोपींना कोणत्या आधारावर अटक केली? असं ते म्हणाले. 

ज्या आधारावर पोलीस कोठडी मागितली, त्याचा तपास सध्या सुरू आहे. त्याच आधारावर (Same Ground) पुन्हा ५ दिवसांची पोलीस कोठडी देता येणार नाही. एका बाजूला फोनमधील चॅटचे विश्लेषण सुरू आहे असे म्हटले जात आहे, मग अधिक तपास करण्यासाठी पुन्हा वेळ कशाला पाहिजे? असा सवाल त्यांनी केला. 

Voter List Scam: बुलढाण्यात मतदार यादीचा 'महाघोळ'! 5000 मृत, एकाच घरात सर्वधर्मीय 126 मतदार

प्रशांत बनकरच्या वकिलांनीही यावेळी पोलिसांच्या मागणीला विरोध केला.  मागील पाच दिवसांपासून प्रशांत बनकर पोलीस कोठडीत आहे. त्यांच्याकडील लॅपटॉपसह मोबाईलचा डिजिटल पुरावा पोलिसांनी जमा केला आहे. एवढ्या पुराव्यांसाठी अधिक पोलीस कोठडी योग्य नाही. न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर बनकर आणि PSI गोपाल बदने दोघांनाही दोन दिवसाची आणखी पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com