जाहिरात

'काहीही झालं तरी फडणवीसांकडे सत्ता नाही', रोहित पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले

सांगलीच्या तासगावमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावरही निशाणा साधला. 

'काहीही झालं तरी फडणवीसांकडे सत्ता नाही', रोहित पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले

सांगली: 'महाराष्ट्र तरुणांनी चालवायचा आहे त्यामुळे तरुणांना संधी दिली पाहिजे.  रोहित पाटील काळजी करू नका, कोणी काही करू शकत नाही. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील जनता तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, शरद पवार यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सांगलीच्या तासगावमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावरही निशाणा साधला. 

काय म्हणाले शरद पवार? 

'देशाच्या संसदेत अडीचशे जागा असतानाही सरकार चालले. पण मोदी साहेब सांगतात, 400 जागा पाहिजे पण 400 जागा आवश्यकता नव्ह्ती. यामागे आम्हाला शंका आहे, देशाच्या घटनेत बदल करण्यासाठी ते अधिक जागांची ताकद लागते. त्यांच्या मनात काहीतरी वेगळ आहे. निवडणुकीनंतर राज्य त्यांचं आलं पण घटनेत बदल करण्याची ताकत त्यांच्यात राहिली नाही.  आता या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष निवडणूक लढवत आहेत. आमचा विचार आहे, महाराष्ट्रात वाटेल ते झालंं तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय..' असं शरद पवार म्हणाले. 

'तासगावमध्ये तुम्ही जो निर्णय घेतलाय तो पाहता आता कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. महाराष्ट्र चालवायचा कोणी? तर ते तरुणांनी चालवायचा आहे त्यामुळे तरुणांना संधी दिली पाहिजे.  रोहित पाटील काळजी करू नका, कोणी काही करू शकत नाही. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील जनता तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही,' असेही ते म्हणाले. 

नक्की वाचा: 'बटेंगे तो कटेंगे'वरुन महायुतीत फूट?; अजित पवार-देवेंद्र फडणवीस आमने-सामने

पहिल्या निवडणुकीचा किस्सा

'55 वर्षांपूर्वी 26 वर्षांचा असताना माझी अवस्था अशीच होती. मी त्यावेी निवडणूक लढवण्याचा विचार केला होता माझ्या निवडणुकीत वेळी सर्व नेते एकत्र होते यशवंतराव चव्हाण यांना त्यावेळी सगळ्यांनी सांगितले मला संधी देऊ नये पण नेत्यांनी ऐकलं नाही. मला तिकीट देऊ नका म्हणून माझ्या भागातले अनेक नेते यशवंतराव चव्हाण यांना भेटले होते. चव्हाण साहेबांनी विचारलं तरुणाला संधी द्यायला तुमचा विरोध का आहे? तर ते म्हणाले तो निवडून येणार नाही. यशवंतराव चव्हाणांनी विचारलं   राज्यात 288 जागा आहेत, त्यातल्या किती निवडून येतील. यावर त्यातल्या जेष्ठांनी सांगितलं 200 ठिकाणी विजय होईल, 88 उमेदवार पडतील अशी स्थिती आहे. यशवंतराव चव्हाण म्हणाले 88 मध्ये बारामतीचीही जागा धरा 89 ठिकाणी पराभव होईल, असे समजा आणि शरद पवारला तिकीट द्या, 'असा किस्सा त्यांनी सांगितला. 

महत्वाची बातमी:  यंदा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक अपक्ष, कोणत्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार? 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com