उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात काही ठिकाणी सभा घेतल्या. योगी आदित्यनाथ यांच्या सभा राज्यभर चर्चेत राहिल्या त्या 'बटेंगे तो कटेंगे' या नाऱ्यामुळे. उत्तर प्रदेशात प्रचलित असलेला नारा योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात आणला. मात्र यावरुन महायुतीत मतभेद निर्माण झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले आहे. बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याविरोधात अजित पवार यांनी उघड भूमिका घेतली. याबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत, महाराष्ट्रात हे चालणार नाही असं म्हटलं होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत अजित पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार हे हिंदू विरोधी सेक्युलर वातावरणात राहिल्यामुळे त्यांना हे समजणार नाही.
(नक्की वाचा- होय,भाजपसोबत बैठक झाली होती! शरद पवारांची कबुली)
ANI ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, यांना जनतेच्या भावना कदाचित समजल्या नसतील. मीडियाने त्यांचा काहीतरी वेगळा अर्थ घेतला असेल किंवा त्यांना योगींच्या वक्तव्याचा अर्थ समजला नसेल. अजित पवार गेल्या अनेक दशकांपासून सेक्युलर म्हणवून घेत असलेल्या लोकांसोबत राहिले आहेत. त्यांचे विचार धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत असले तरी त्यांचं धर्मनिरपेक्ष असणं म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखं आहे.
हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा मिजास आमि राष्ट्रवादी मिजास समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
(नक्की वाचा : रामटेकवरुन 'मविआ'त वादाची ठिणगी! काँग्रेसकडून बंडखोरांचा प्रचार, ठाकरे गट आक्रमक)
काय म्हणाले होते अजित पवार?
बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर अजित पवारांनी म्हटलं होतं की आम्ही याच्याशी सहमत नाही. महाराष्ट्रात असं काही चालणार नाही. महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे. आम्ही त्याच मार्गावर जाऊ. आम्ही सबका साथ, सबका विकास यावर विश्वास ठेवतो, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world