जाहिरात

कमाल झाली! निवडुंगाच्या शेतीनं तरुण झाला करोडपती, PM मोदींची इच्छाही केली पूर्ण

Cactus Farming : सतीश अत्रे या तरुणानं पारंपारिक शेतील फाटा देत चक्क निवडुंगाच्या शेतीमधून करोडपती होण्याची किमया केली आहे.

कमाल झाली! निवडुंगाच्या शेतीनं तरुण झाला करोडपती, PM मोदींची इच्छाही केली पूर्ण
शिर्डी:

राजेंद्र भुजबळ, प्रतिनधी 

हवामानाच्या लहरीपणावर अवलंबून असलेला शेती हा एक धोकादायक व्यवसाय मानला जातो. सतत बदलणाऱ्या हवामानाच्या पॅटर्नचा दरवर्षी हजारो शेतकऱ्यांना फटका बसतो. या सर्व अडचणीतही अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करुन मोठं उत्पन्न घेत असतात. शिर्डी जवळच्या अस्तगावातील सतीश अत्रे या तरुणानं पारंपारिक शेतील फाटा देत चक्क निवडुंगाच्या शेतीमधून करोडपती होण्याची किमया केली आहे.

नर्सरीचं गाव अशी अस्तगावची ओळख आहे. या गावातल्या सतीश अत्रे या तरुणानं निवडुंगाच्या शेतीला प्राधान्य देत आपल्या नर्सरी तसेच गावाचं नावं थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचवलंय.  निवडुंगावर अभ्यास करत या तरुणाने देश विदेशातील रोपे मिळवून आपल्या नर्सरीत वाढविली  त्यांच्या नर्सरीतील या निवडुंगाला अनेकांनी पसंती दिली आणि त्याच काटेरी रोपांनी त्यांना करोडपती बनवलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कसा केला प्रयोग?

निवडुंग म्हटलं तर टोचणारे काटे डोळ्यसमोर उभे राहतात मात्र याच टोचणाऱ्या काट्याना सतीशने मायेने जवळ करत  त्याने भारतातील निवडुंगाची रोपांची साठवण करत त्यावर अभ्यास करत त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी नर्सरी उभारली त्यात फुलझाडे, फळझाडे व इतर औषधी वनस्पतीबरोबर त्यांनी आपल्या नर्सरीत विदेशातील निवडुंगाच्या रोपांचीही लागवड करत अनेक सौंशोधनही केलं.

गुजरातमधील 'स्टॅचू ऑफ युनिटी'मध्ये त्याच्या कामाला सर्वप्रथम यश आलं. भारतातील सर्वात उंच असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या बाजूस असणाऱ्या चाळीस एकर जागेत गार्डन स्टॅचू ऑफ युनिटी या ठिकाणी गार्डन बनविण्यासाठी त्यांना एका संस्थेने प्रचारण केलं, तर पंतप्रधान कार्यालयातूनही सतीश यांच्या त्यांना ही आव्हानात्मक जबाबदारी सोपवण्यात आली. 

( नक्की वाचा : कश्मिरी सफरचंदाला टक्कर देणार महाबळेश्वरचं सफरचंद; शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग )
 

सतीशनं हे आव्हान स्विकारलं. एका खेड्यातील ह्या शेतकऱ्याने त्याच्या गुणवत्तेच्या जोरावर लँडस्केपींग डिझाईन बनवून हे बाग तयार करण्याचं टेंडर मिळवलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बागेत स्कॅकटस अर्थात निवडुंगाची दोन एकर क्षेत्राची बाग असावी ही इच्छा व्यक्त केली होती. या पठ्याने हे आवाहन स्वीकारून 2018 पासून सुरु केलेल्या कामात 40 एकर जागेत वेगवेगळी गार्डन्स बनविली त्यात दोन हजार देश विदेशातील फुलांची झाडे, दीड हजारहून जास्त निवडुंगाची झाडे आणि अनेक औषधी वनस्पतींता समावेश आहे. 

मेहनत आणि आपल्या टॅलेंट च्या माध्यमातून मिळवलेल्या या यशापासून अन्य शेतकऱ्यानं प्रेरणा घेतली तर त्यांच्या व्यवसायातही समृद्धी येईल, असा विश्वास सतीश अत्रे यांनी व्यक्त केलाय.    
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com