सुजीत आंबेकर, सातारा
महाबळेश्वर म्हटलं की तिथली स्ट्रॉबेरी लगेच डोळ्यासमोर येते. मात्र आता स्ट्रॉबेरीला सफरचंदाची साथ मिळाली आहे. कारण मिनी काश्मीर म्हणून ओखळ असलेल्या महाबळेश्वरच्या पाचगणीमध्ये व खिंगर परिसरात सध्या सफरचंदाची शेती फुलू लागली आहे. महाबळेश्वरच्या पाचगणी येथे सफरचंदाच्या झाडांची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आतापर्यंत स्ट्रॉबेरीसाठी जगात प्रसिद्ध असणार हे ठिकाण आता सफरचंदासाठी देखील नावारुपाला येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा- मुंबईकरांना दिलासा! बर्फीवाला-गोखले पूलादरम्यानच्या लेनचं काम पूर्ण, 'या' दिवशी सुरु होणार वाहतूक)
महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांनी केलेला हा सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी होऊ लागला आहे. हिमाचल प्रदेशच्या शिमला, काश्मीरमधील थंड हवेच्या उंच ठिकाणी सफरचंदाची शेती केली जाते. आता सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, खिंगर परिसरातील शेतकऱ्यांनी सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
सध्या पाचगणी खिंगर परिसरात ब्लॉसम नर्सरी त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांनी व शेतकरी वैभव माने यांनी सफरचंदाची रोपे स्थानिक शेतकऱ्यांना देऊन सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
प्रयोगशील शेतकरी वैभव माने यांनी म्हटलं की, सफरचंदासाठी चार ते पाच महिने थंड वातावरण लागलं. महाबळेश्वरमध्ये असं वातावरण आहे, त्यामुळेच येथील वैभव माने सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग येथे करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी हिमाचल प्रदेशातून अंबोरी, सोनोरी, रेड डिलिशियस आणि हार्बर 99 या जातीची सफरचंदाची झाडे मागवली. त्यानंतर या कलमांची लागवड केली.
(नक्की वाचा : Maharashtra Budget 2024 मुंबई, पुणे, नागपूरकरांचा प्रवास होणार जलद! बजेटमध्ये मोठी घोषणा )
तीन वर्षांनंतर या झाडांना फळे लागली आहे. या सफरचंदाची चव आणि गोडी हिमाचल प्रदेशमधील सफरचंदासारखीच आहे, असं वैभव माने यांनी सांगितलं. सफरचंदाच्या शेतीचा येथील शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसोबत सफरचंदाचा देखील पर्याय उपलब्ध होईल, माने यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world