
मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News : जळगावच्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे.
वैशाली सूर्यवंशी या शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या असून, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी आहेत. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
(नक्की वाचा- काँग्रेसचे मंत्री दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार, जीच्याशी लग्न करणार ती अमरीन कौर कोण?)
2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे भाऊ किशोर पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे वेधले गेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, ठाकरे गटाचा एक मोठा चेहरा पक्षातून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा- Rain News: अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश)
वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रवेशामुळे भाजपला पाचोरा-भडगाव मतदारसंघात अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. या प्रवेशानंतर आता पाचोरा-भडगावात भाजपची ताकद अधिक वाढेल आणि स्थानिक पातळीवरील राजकारण अधिक गतिमान होईल, असे मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world