जाहिरात

शिवसेनाप्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-मनसेचा भव्य सोहळा, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

Balasaheb Thackeray Birth Anniversary 2026: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त मुंबईमध्ये मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-मनसेचा भव्य सोहळा, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
Balasaheb Thackeray Birth Anniversary 2026: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष
Aaditya Thackeray X

Balasaheb Thackeray Birth Anniversary 2026: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यास 23 जानेवारीपासून आरंभ होतोय. या  जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात मुंबईतील भव्य सोहळ्याने होणार आहे. शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृह येथे हा सोहळा आयोजित करण्यात आलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Who Will Be The Next Mayor Of Mumbai: मुंबईचा महापौर भाजपचाच, BJPच्या वरिष्ठ नेत्यांची NDTVला माहिती

(नक्की वाचा:Who Will Be The Next Mayor Of Mumbai: मुंबईचा महापौर भाजपचाच, BJPच्या वरिष्ठ नेत्यांची NDTVला माहिती)

ठाकरे बंधू काय बोलणार?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिन शिवसेना तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी विशेष ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने आनंद दुप्पट झालाय. षण्मुखानंदमधील सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संबोधित करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Mayor: ...तर ठाकरे गटाला लागणार महापौरपदाची 'लॉटरी'? कसं?  वाचा सविस्तर

(नक्की वाचा: Mumbai Mayor: ...तर ठाकरे गटाला लागणार महापौरपदाची 'लॉटरी'? कसं? वाचा सविस्तर)

दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक-शिवसेनाप्रेमी शिवतीर्थावर येतात. यंदाचे वर्ष शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीचे असल्याने मोठी गर्दी उसळणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.  

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेला किती जागांवर विजय मिळाला, पाहा एका क्लिकवर

पीडीएफ फाइल पूर्ण पाहण्यासाठी X वर क्लिक करा

Election Results 2026.pdf
Listen to the latest songs, only on JioSaavn.com