
Sangli News : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते या वसतीगृहांचे उद्घाटन करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, सर्व सामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून आहे. मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात 125 वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असं शिरसाट म्हणाले.
(नक्की वाचा- Political News : राज्यमंत्रिपद फक्त नावापुरतं? महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली)
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुढे म्हणाले की, विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही देण आहे. मागासवर्गियांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात. वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी.
(नक्की वाचा- Beed News : ऊसतोडणी कामगारांचं भयाण वास्तव; 30 ते 35 वयोगटातील 843 महिलांनी गर्भपिशवी काढली)
आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world