जाहिरात

Solapur News : सोलापुरात ठाकरे गटाला धक्का, माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत

Solapur Political News : जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते . 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आमदार झाले होते.

Solapur News : सोलापुरात ठाकरे गटाला धक्का,  माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत

Solapur News : करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील "मुक्तागिरी" निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील , शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख आणि  शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे , शिवसेनेचे करमाळा - माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, सिंदखेडराजाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती . माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात चर्चा रंगली आहे 

(नक्की वाचा-  Ajit Pawar: 'तडजोड होणार नाही..', वर्धापनदिनी अजित पवारांचे मोठे विधान, मनोमिलनावर काय म्हणाले?)

जयवंतराव जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते . 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आमदार झाले होते. 2019 साली विधान सभेला संजय (मामा) शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 साली नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे.

माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त दिवंगत नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते दिवंगत अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते .जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे.लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे समजते.

(नक्की वाचा- Sharad Pawar: जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांची भूमिका ठरली, कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगितली)

एकनाथ शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिंन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकवणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com