जाहिरात

ST Corporation : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे ST तोट्यात, परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य

Transport Minister pratap sarnaik : महिलांना एसटी प्रवासात तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सवलत मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना तर एसटीचा प्रवास मोफत आहे.

ST Corporation : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे ST तोट्यात, परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य

ओमकार कुलकर्णी, धाराशिव

एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद होणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांन दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. धाराशिवमध्ये 'व्हॉईस ऑफ मीडिया' या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पत्रकारांना एसटी प्रवासात सवलत मिळावी अशी मागणी पत्रकारांनी यावेळी केली. यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, सरकारकडून महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे. महिला आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी महामंडळाला फटका बसत आहे. एसटीला दररोज 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणाला मारहाण; गज्या मारणे टोळीतील तिघांना अटक)

महिलांना एसटी प्रवासात तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सवलत मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना तर एसटीचा प्रवास मोफत आहे. मात्र परिवहन मंत्र्यांना केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याच शक्यता आहे. 

(नक्की वाचा- आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर)

पाहा VIDEO : प्रताप सरनाईक काय म्हणाले?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Pratap Sarnaik, ST Bus, ST Corporation, प्रताप सरनाईक