गेल्या दोन दिवसांपासून एसटी भाडेवाढीवरुन (ST Fare Hike) महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळत आहे. एसटी भाडेवाढीवरून शिंदे गट आणि अजित पवार गटात दुमत पाहायला मिळत आहे. एसटी बसेसची अवस्था ठीक नसताना भाडेवाढ करणे योग्य नसून अद्याप निर्णय लागू झालेला नाही. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आले आहेत, त्यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल असं अजित पवार यांनी म्हटलंय आहे. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी परस्पर भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना एसटी भाडेवाढ करण्यात आली का? भाडेवाढीवरुन महायुतीत दुमत आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाडेवाढीवरुन महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
एसटी महामंडळाने केलेल्या 15 टक्के भाडेवाढीच्या निर्णयावरून महायुतीत विसंवाद असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. एसटी बसेसची अवस्था ठीक नसताना भाडेवाढ करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील परिवहन विभागाने या दरवाढीला हिरवा कंदील दाखवून ती लागूही केली. याबाबत शनिवारी पुन्हा अजित पवारांना पत्रकारांनी विचारणा केली असता ‘अजून निर्णय लागू झालेला नाही. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आले आहेत, त्यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल' असं सांगितलं. ‘महामंडळाच्या बसची अवस्था बिकट असताना भाडेवाढ कशासाठी? लोक आपल्याला काय म्हणतील, याचा विचार झाला पाहिजे,' या मतावर अजूनही पवार ठाम आहेत.
Shiv Sena News: 'ज्यानी एकनाथ शिंदेंचे पुतळे जाळले, तेच आता...' शिंदेंच्या सेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर
विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाडीला मंजूरी देण्यात आली आहे. एसटीच्या तिकीटात 14.95 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ करणं अपरिहार्य असल्याचं राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.
राज्यभरात भाडेवाढ लागू...
महायुतीमध्ये एसटी भाडेवाढीवरुन मतमतांतरे असताना दुसरीकडे 25 जानेवारी 2025 पासून राज्यभरात भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world