जाहिरात

Amravati News : पोटात गर्भ असलेल्या ‘त्या’ बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; अमरावतीतील दुर्मिळ घटना

बाळाच्या शस्त्रक्रियेवेळी बाळाच्या पोटाला तब्बल 16 टाके पडले होते. इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसाचा बाळ सुखरूप असून त्याची तब्येत एकदम ठणठणीत आहे.

Amravati News : पोटात गर्भ असलेल्या ‘त्या’ बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; अमरावतीतील दुर्मिळ घटना

गर्भवती महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याची दुर्मिळ घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली होती. 1 फेब्रुवारीला या महिलेची बुलढाण्यातच सुखरूप सिझेरियन प्रसुती करण्यात आली. त्यानंतर पोटात गर्भ असलेल्या त्या बाळाला पुढील उपचारांसाठी अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीच्या डॉक्टरांनी 3 फेब्रुवारी रोजी तीन दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करत बाळाच्या पोटातून एक नव्हे तर चक्क दोन मृत अर्भक काढले होते. तर देशातील ही पहिलीच घटना होती. आज तब्बल 17 दिवसानंतर  बाळाला अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली आहे.

( नक्की वाचा : राजकारण्यांचा साहित्य संमेलनाशी संबंध काय? शरद पवारांनी थेट सांगितलं )

 यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंगल व सुपर स्पेशलिस्ट अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी बाळाच्या कुटुंबाला भेट वस्तू देत बाळाच्या आई वडिलांचा सत्कार केला. तीन वर्ष बाळाची सोनोग्राफी करावी लागणार असून डॉक्टर तीन वर्षे या बाळाची काळजी घेणार आहे. 

( नक्की वाचा : '1999 साली वाजपेयी सरकार मीच पाडलं', शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट )

बाळाच्या शस्त्रक्रियेवेळी बाळाच्या पोटाला तब्बल 16 टाके पडले होते. इतक्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसाचा बाळ सुखरूप असून त्याची तब्येत एकदम ठणठणीत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Amravati News, अमरावती