जाहिरात
This Article is From Apr 19, 2024

जळगावात केमिकल कंपनीला आग, तीघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी

जळगावात केमिकल कंपनीला आग, तीघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी
जळगावात केमिकल कंपनीला आग, तीघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी
जळगाव:

जळगाव शहरातील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीत स्फोट झाला होता. या स्फोटात मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे, तर तीन कामगारांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. जखमींना जळगाव सामान्य रुग्णालय, ओम क्रिटिकल केअर सेंटर, खुशी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि न्यू मंगलमूर्ती हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना...

जळगाव ‘एमआयडीसी'मधील डब्ल्यू सेक्टरमध्ये मोरया ग्लोबल लिमिटेड या केमिकल कंपनीत ही घटना घडली. बुधवारी कामाची पहिली शिफ्ट सुरू झाल्यावर सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी केमिकल बॉयलरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून कामगारांनी बाहेर धाव घेतली. शिफ्ट सुरु असताना अकूण २५ कामगार काम करत होते. घटने नंतर बचाव पथकाने तातडीने बचाव कार्य सुरु केले. त्यातील २३ कामगरांना टप्प्या टप्प्यामध्ये बाहेर काढण्यात आले. दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी आग विझविण्याकरिता जळगाव शहर महानगरपालिका, जैन इरिगेशन, धरणगाव नगर परिषद, पाचोरा नगर परिषद, नशिराबाद नगर परिषद, जामनेर नगर परिषद, वरणगाव नगर परिषदेच्या 50 - 60  बंबांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली

जखमींमध्ये यांचा समावेश

हेमंत गोविंदा भंगाळे (वय २७, रा. प्रभात कॉलनी), मयूर राजू खैरनार (२७, रा. जुना खेडी रोड), विशाल रवींद्र बारी (२८, रा. श्रीकृष्णनगर, जुने जळगाव), सचिन श्रावण चौधरी (२४, रा. रामेश्वर कॉलनी), गोपाल आत्माराम पाटील (रा. विखरण, ता. एरंडोल ह. मु. अयोध्यानगर), भिकन पुंडलिक खैरनार (४२, रा. इच्छादेवी परिसर), चंद्रकांत लक्ष्मण पाटील (२४, रा. धुळे, ह. मु. रामेश्वर कॉलनी), जगजीवन अनंत परब (५३, रा. अयोध्यानगर), रमेश अजमल पवार (२१, रा. रामेश्वर कॉलनी). यांचा समावेश आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com