जाहिरात

Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी भरुन ठेवा! 1 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कधी अन् कोणत्या भागात? वाचा...

पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कोणकोणत्या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे? जाणून घ्या... 

Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी भरुन ठेवा! 1 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कधी अन् कोणत्या भागात? वाचा...

Thane Water Cut News: ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये बुधवारी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या कार्यासाठी हा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कोणकोणत्या भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे? जाणून घ्या... 

ठाण्यात पाणी पुरवठा राहणार बंद!

समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणीपुरवठा करण्यासाठी अलीकडच्या काळात 116‍8‍मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी  कार्यान्वित करण्याकरिता  इंदिरानगर नाका येथे 750मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे आवश्यक आहे.

Kalyan Traffic News: कृपया लक्ष द्या! कल्याणमधील महत्त्वाचा पूल 10 दिवस बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा डिटेल्स

कोणत्या भागात पाणीबाणी?

परिणामी बुधवार दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार दिनांक 27/11/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत  परिसर आदी भागांचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनांचे सर्टिफिकेट रिन्यूअल फ्री कमी करा, वाहतूक संघटना आक्रमक, केला गंभीर आरोप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com