जाहिरात

महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा प्रचंड अपमान; कोण,काय बोललं वाचा Inside स्टोरी

Thane Municipal Corporation Election 2026: काँग्रेसच्या एका नेत्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला कसा अपमान केला याचा सगळा तपशीलच मांडलाय.  

महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा प्रचंड अपमान; कोण,काय बोललं वाचा Inside स्टोरी
ठाणे:

रिझवान शेख

Thane Municipal Corporation Election 2026: भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर इंडिया आघाडीची तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेला सत्ता मिळाली होती. या मित्र पक्षांच्या मदतीमुळे शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. ज्या काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने सत्ता मिळवली आज तीच शिवसेना आपल्याशी शत्रूपेक्षा वाईट वागू लागल्याची भावना काँग्रेस नेत्यांमध्ये तयार झाली आहे. ही भावना आजवर काँग्रेस नेते दबक्या आवाजात बोलून दाखवत होते, मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते याबद्दल उघडपणे बोलू लागले आहेत. काँग्रेसच्या एका नेत्याने ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला कसा अपमान केला याचा सगळा तपशीलच मांडलाय.  

नक्की वाचा: BMC Election 2026 BJP Candidate List: भाजपची पहिली यादी जाहीर, कोणा-कोणाला मिळाली उमेदवारी?

ठाण्यात महाविकास आघाडी फुटली

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला पेच न सुटल्याने काँग्रेसने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून ठाण्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मित्रपक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. "हमे तो अपनो ने लुटा, गैरो में कहा दम था," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून, शरद पवार गट आणि ठाकरे गटाने काँग्रेसला डावलल्याची भावना व्यक्त केली आहे.

नक्की वाचा: KDMC Election: कल्याणमध्ये शिंदे गटाला धक्का! जागावाटपाच्या वादातून उपशहराध्यक्षांचा राजीनामा

ज्यांना मदत केली तेच जीवावर उठले!

ठाण्यात काँग्रेसने सुरुवातीला 35 जागांची मागणी केली होती, जी नंतर 20 जागांपर्यंत खाली आणली. मात्र, मित्रपक्ष जागा सोडण्यास तयार नव्हते. धक्कादायक बाब म्हणजे, महाविकास आघाडीने मनसेला सोबत घेतल्याने आणि त्यांना एका प्रभागात 2-2 जागा दिल्याने काँग्रेस अधिकच भडकली आहे. "ज्या जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांना अडचणीच्या काळात मदत केली, तेच आज काँग्रेसच्या जिवावर उठले आहेत," असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसकडे कार्यकर्ते आणि पैसा नसल्याचे म्हणून बैठकीत आपल्या पक्षाला हिणवण्यात आल्याचे विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे.  आता काँग्रेस ठाण्यात सर्व जागांवर ताकदीने लढणार असून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातही उमेदवार उभा करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com