राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या (Trainee IAS Officer Pooja Khedkar) आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात रूजू झाल्या आहेत. त्यांनी केलेल्या कारमान्यांमुळे देशभरात पूजा खेडकर, यूपीएससी याबाबत चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खासगी ऑडी कारला लाल रंगाचा दिवा लावल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. यानंतर आरटीआयमधून त्यांच्याबद्दलच्या अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी, सुरक्षा, शिपाई, स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. मात्र प्रशिक्षणार्थी पातळीवर या सुविधा दिल्या जात नसतानाही त्यांनी आपल्या खासगी ऑडीकारला लाल रंगाचा दिवा लागला होता. या सर्व प्रकारानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहार दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती.
प्रशिक्षणार्थी असतानाच स्वतंत्र दालनाची मागणी, त्यासाठी माजी अधिकारी असलेल्या वडिलांचा वशिला, स्वतंत्र दालन, वाहन, शिपाई मिळत नसतानाही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अरेरावी करणे, आलिशान खासगी गाडीवरच लाल दिवा लावणे असे अनेक कारनामे पूजाच्या नावावर लागले आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपल्या 26 पानी अहवालात पूजाचे किस्से सांगितलेत.
पूजा खेडकरची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे.
नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे.
खेडकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) 'यूपीएससी' विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर, 'यूपीएससी'ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्याकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्या. तरीही त्यांना प्रशासकीय सेवेत कसे घेतले, हा प्रश्न आहे. पूजा खेडकरांच्या नियुक्तीची आणि तिच्या वागणुकीची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना पंतप्रधान कार्यालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे आता पूजा यांच्या वडिलांची संपत्ती यासर्वात महत्त्वाचं ठरेल.
नक्की वाचा - वडिलांची संपत्ती 40 कोटी, लेकीला नॉन क्रिमिलेयरमधून IAS पद; पूजा खेडकरांना कोणाचा राजकीय वरदहस्त?
एवढी संपत्ती असताना पूजा गरीब कशा ?
वंचित बहुजन आघाडीकडून नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करताना पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची व पत्नीची एकूण मालमत्ता 40 कोटी 54 लाख 66 हजार 85 रुपये दाखवली आहे. त्यामध्ये बँक खात्यासह भालगाव (पाथर्डी, नगर), बारामती, उमरोली (पनवेल) व नगर येथील जमीन, सदनिकांचा समावेश आहे. पत्नीच्या नावेही विविध ठिकाणी जमिनी, पुणे, मुंबई येथे सदनिका व दुकाने आदींचा समावेश आहे. यामुळेच पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान पुण्यात रुजू होण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांशी याबाबत मागणी केली होती. याचा व्हॉट्सअॅप चॅट NDTV मराठीच्या हाती लागले आहे. या चॅटमधून त्यांनी अधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्याचं दिसून येत आहे.
हॅलो,
मी डॉ. पुजा खेडकर, मला पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पुण्यात नियुक्त करण्यात आलं आहे. डॉ. दिवसे सरांनी मला तुमचा नंबर दिला. मी 3 जूनला रुजू होतेय. माझी काही कागदपत्रं बुलढाणा कलेक्टर ऑफिसमधून पाठवले गेलेत. पण मला ते आपल्या कार्यालयात मिळत नाहीयेत. कृपया करुन काय केलं जाऊ शकतं, हे मला कळवा.
धन्यवाद
दुसरा अधिकारी-
OK. काही इश्शू नाही. सोमवारी आपण त्यांना ट्रेस करु.
पुजा खेडकर-
तसच मला माझ्या बसण्याच्या व्यवस्थेबद्दल, गाडीबद्दल
माहिती हवी आहे म्हणजे मी त्याप्रमाणे नियोजन करेल.
दुसरा अधिकारी-
सोमवारी, मी कलेक्टर सरांसोबत चर्चा करतो
पुजा खेडकर- नक्की, थॅक्यू.
पुजा खेडकर-
माझ्या राहाण्याच्या व्यवस्थेबद्दल, प्रवासाबद्दल,
कॅबिन इत्यादीबद्दल काही अपडेट?
दुसऱ्या अधिकाऱ्याचा प्रतिसाद नाही.
पूजा खेडकर-
कृपया प्रतिसाद द्या, महत्वाचं आहे.
दुसरा अधिकारी-
सुप्रभात. तुमचं स्वागत आहे.
तुम्ही जेव्हा याल तसं चेक करू.
पूजा खेडकर-
मला वाटतं मी येण्याअगोदर ते केलं जावं
मी आल्यानंतर नाही. मला इतर गोष्टीही
त्याप्रमाणे ठरवायच्या आहेत. नंतरसाठी ते ठरवू शकत नाही.
पूजा खेडकर-
परत कॉल करण्यात काही प्रॉब्लेम आहे का?
दुसऱ्या अधिकाऱ्याचं उत्तर नाही.
पुजा खेडकर-
कृपया 3 जूनच्या माझ्या ज्वाईनच्या आधी माझी निर्धारीत कॅबिन आणि गाडीची व्यवस्था पूर्ण करुन घ्या. नंतर त्यासाठी वेळ नसेल. जर ते शक्य नसेल तर मला सांगा, मी कलेक्टर सरसोबत बोलते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world