- नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे दत्त जयंतीपासून घोड्यांचे चेतक फेस्टीव्हल.
- सारंगखेडा यात्रेतील प्रमुख आकर्षण चेतक फेस्टीव्हल असून यात देशभरातून विविध जातींचे हजारो घोडे सहभागी होतात
- या फेस्टीव्हलमध्ये बुलेट मोटरसायकल विरुद्ध घोडा अशी रेस घेण्यात आली.
प्रशांत जव्हेरी
दत्त जयंतीपासून नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथं यात्रेला सुरूवात होते. ही यात्र खरं तर अश्वप्रेमींसाठी परवणी असते. कारण इथं होणारा चेतक फेस्टीव्हल. या चेतक फेस्टीव्हलमध्ये देशभरातून वेगवेगळ्या जातीचे घोडे सहभागी होतात. त्यांची वैशिष्ट्ये ही खास असतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात अश्वप्रेमी सारंगखेडा इथं येत असतात. सध्या हा फेस्टीव्हल सुरू आहे. त्यामुळे इथं वेगवेगळ्या जातीचे घोडे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या फेस्टीव्हलच्या पहिल्या दिवशी सर्वांचे लक्ष घोडा विरुद्ध बुलेट यांच्या रेसकडे लागले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा येथे दत्त जयंती पासून सुरू असलेल्या सारंगखेडा यात्रेला मोठ्या प्रमाणात अश्वप्रेमी भेट देत आहेत. देशभरातून 2 हजार 800 घोडे या सारंगखेडा यात्रेत दाखल झाले आहेत. यात्रेच्या प्रमुख आकर्षणाच्या केंद्र म्हणजे चेतक फेस्टिवल आहे. या चेतक फेस्टिवल दरम्यान आश्वांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच्यातून एक अनोखी स्पर्धा यावेळी सारंगखेडा यात्रेत चाहत्यांना पाहायला मिळाली.
ती म्हणजे ‛बुलेट मोटरसायकल विरुद्ध घोडा' अशी रेस झाली. ही रेस पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यंत्र जिंकणार की जातीवंत घोडा याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात्रेदरम्यान तयार करण्यात आलेल्या 200 मीटरच्या रेस ट्रेकवर बुलेट मोटरसायकल आणि घोड्यामध्ये रेस झाली. या रेसमध्ये मध्यप्रदेशच्या माहेश्वरी येथील यादव स्टड फार्मची ‛राणी' घोडी सहभागी झाली होती. या राणी घोड्यीच्या वेगा पुढे बुलेट मोटरसायकल अक्षरश: फिकी पडली. बुलेटला पराभवाला सामोरं जावं लागलं.
नक्की वाचा - Pune News: इंद्रायणीत मृत माशांचा खच! आळंदीकर संतप्त, 'माणसं मरायची वाट पाहणार का?'
मशीनच्या हॉर्स पावर आणि अश्वचा हॉर्स पावर या मध्ये विजय हा आश्वाचाच झाला. तसेच आज पासून चेतक फेस्टिवल येथे अश्वांच्या विविध स्पर्धांना देखील सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सारंगखेडा यात्रेला हजेरी लावत आहेत. पण पहिल्याच दिवशी चाहत्यांची मन मात्र घोडा विरुद्ध बुलेट या रेसनेच जिंकले. याचे खास ड्रोन शॉर्ट ही घेतले गेले. या रेसबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. घोड्याने शेवटी आपली कमाल दाखवत आपणच वेगाचे खरे दावेदार असल्याचं दाखवून दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world