'मोदींचा खुर्च्यांशी संवाद...', शिवाजी पार्कवरील सभेवरुन ठाकरेंचा खोचक टोला

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलते होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

किशोर बेलसारे, नाशिक: 'मी पोकळ आश्वासने देणार नाही. मी शक्य असेल तेच बोलतो अन् बोलतो ते करुन दाखवतो. मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही. नाशिक दत्तक घेणार होते. नाशिकला वाऱ्यावर सोडलं अन् गद्दारांना डोक्यावर घेतलं, असे म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलते होते. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

'तुमचं प्रेम, विश्वास याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. मी पोकळ आश्वासने देणार नाही. मी शक्य असेल तेच बोलतो अन् बोलतो ते करुन दाखवतो. मी म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही. नाशिक दत्तक घेणार होते. नाशिकला वाऱ्यावर सोडलं अन् गद्दारांना डोक्यावर घेतलं. नाशिकमध्ये एक चांगली गोष्ट दिसली शिवसेनेसोबत महाविकास आघाडी म्हणून जे सर्व पक्ष एकत्र आले ते ताकदीने काम करत आहेत. कराडसाहेबांना मी विधीमंडळात
घेऊन जाण्याचा शब्द दिला आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

नक्की वाचा: राज ठाकरे आले, फक्त 2 मिनिटं बोलले अन् माघारी फिरले; कारण काय?

'काल शिवाजी पार्कला आले. शिवाजी पार्क अर्ध्याहून रिकामे होते. खुर्च्यांशी संवाद साधून जातात. मला बोलले नाहीत, घाबरलेत वाटतं. लोकसभेला नकली संतान म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. जर तुमचं बाळासाहेब ठाकरेंवर तुमचं प्रेम असेल तर त्या खोलीमध्ये दिलेला शब्द का मोडला. तुम्ही माझ्याशी कसे वागला हे लोकांना माहित आहे. मी तुमच्याशी वाईट वागलो असेल तर माझ्याशी वैर असावे पण तुम्ही शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालात. अशा गद्दारांच्या प्रचाराला मुख्यमंत्री येतात.  मी राज्यभर फिरतोय, गुंडागर्दी कोयता गँगची दहशत वाढतेय. काल शिवाजी पार्कवरुन त्यांनी मला आवाहन दिले. तुम्ही सर्वांनी मतांचे धर्मयुद्ध करा. आम्ही धर्माच्या नावावर मते मागितली नाहीत. तुमची कर्म काय आहेत ते सांगा आणि मते मागा,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाची बातमी: 'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले