
Swargate-Katraj Underground Metro News: पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ने पुणे मेट्रोच्या स्वारगेट-कात्रज भूमिगत विस्तारासाठी सेमइंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेडला (पूर्वी आयटीडी सीमेंटेशन इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) कंत्राट दिले आहे. महा मेट्रो अधिकाऱ्यांनी कंत्राट जारी झाल्याची पुष्टी केली असून, लवकरच एंगेजमेंट लेटर सोडले जाईल. वर्क ऑर्डर नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असून, बांधकाम २०२५ च्या शेवटी सुरू होईल. (Pune Metro News)
स्वारगेट ते कात्रज अंडरग्राऊंड मेट्रोचे कंत्राट ठरले
याबाबतची माहिती देताना महा मेट्रोचे डायरेक्टर (वर्क्स) अतुल गाडगील सांगितले की, "२० सप्टेंबरला आम्ही बोली उघडल्या होत्या, आणि ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट लेटर साइन होईल. आम्ही १० दिवसांत कंत्राट निश्चित केले, आणि शॉर्टलिस्ट केलेली कंपनी पुढील महिन्यात काम सुरू करेल," हा प्रकल्प पुणे मेट्रोच्या टप्पा II चा भाग असून, सातारा रोडवरील वाहतुकीची गर्दी कमी करण्यासोबतच कात्रज आणि स्वारगेटमधील उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे उद्दिष्ट आहे.
किती लांब असेल मार्ग, कोणती स्थानके असणार?
हा भूमिगत मार्ग ५.५ किमीचा असेल. ज्यात पद्मावती, कात्रज आणि मार्केट यार्ड स्टेशनांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर बलाजी नगर आणि बिबवेवाडी स्टेशन जोडण्यात आले. सुधारित निविदा ११ एप्रिलला जारी करण्यात आली. या प्रकल्पासाठी सहा प्रमुख बांधकाम कंपन्यांनी बोली सादर केल्या होत्या, ज्यात टाटा प्रोजेक्ट्स, आयटीडी सीमेंटेशन, एल अँड टी, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, अफकॉन्स-एसएएम इंडिया आणि एचसीसी-कल्पतरू जॉईंट व्हेंचरचा समावेश होता.
अवघ्या 15 मिनिटात होणार प्रवास
दरम्यान, सध्या कात्रज ते स्वारगेट असा प्रवास करायला साधारण अर्धा ते एक तास लागतो. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, कात्रज आणि स्वारगेटमधील प्रवासाचे वेळ सध्या ४० मिनिटांवरून अंदाजे १५ मिनिटांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी मदत होणार असून त्यांचा वेळ वाचणार आहे.
नक्की वाचा - Pune News: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रॅगिंग? कॅडेटसोबत भयंकर घडलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world