जाहिरात

Pune News : 'पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदानासाठीच प्रेरणास्थान म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे' - अमित शाह

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे साडेतेरा फूट उंचीचा हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या निर्मितीसाठी चार हजार किलो ब्राँझचा वापर करण्यात आला असून, शिल्पकार विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.

Pune News : 'पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदानासाठीच प्रेरणास्थान म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे' - अमित शाह

Pune News : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज शुक्रवारी 4 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे साडेतेरा फूट उंचीचा हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या निर्मितीसाठी चार हजार किलो ब्राँझचा वापर करण्यात आला असून, शिल्पकार विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.

यावेळी अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, युद्धाच्या कलेचे काही नियम हे कधीही बदलत नाही. युद्धात व्यूहरचनेचे महत्त्व, त्वरेचे महत्त्व गरजेचे असते. समर्पण आणि देशभक्ती आणि सगळ्या महत्त्वाचे म्हणजे बलिदानासाठीची भावनाच विजय मिळवून देते. हे सगळे गुणांचे उत्कृष्ट उदाहरण शोधायचे असेल तर ते केवळ बाजीराव पेशव्यांमध्येच मिळेल.

अनेकजण असे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वातंत्र्याची लढाई आणि पेशव्यांनी ती पुढे सुरू ठेवली नसती तर आज भारताचे मूळ स्वरुप टीकलेच नसते. पराभव निश्चित आहे असे मानल्या जाणाऱ्या लढाया देखील थोरल्या बाजीरावांनी जिंकल्या. पालखेडच्या विजयाचे बारकाईने वाचल्यास कळेल की निजामाच्या समोर हा विजय अकल्पनीय विजय होता. मात्र न थकता, न थांबता थोरल्या बाजीरावांनी गुलामीच्या सगळ्या निशाणं नष्ट केली.

Pune Highway Traffic Jam: अमित शाहांच्या दौऱ्याचा पुणेकरांना फटका? अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

नक्की वाचा - Pune Highway Traffic Jam: अमित शाहांच्या दौऱ्याचा पुणेकरांना फटका? अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

पुतळा घडवणाऱ्यांचे मी कौतुक करतो, जदुनाथ सरकारांनी बाजीरावांबद्दल बरंच लिहिले आहे, मात्र त्यांचे एक वाक्य मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी म्हटलंय की  कुठल्या व्यक्तीचा जन्म घोड्यासोबत होऊ शकत नाही, मात्र बाजीराव हे एकमेव व्यक्ती असे आहेत ज्यांचा जन्मच घोड्यासोबत झाला असावा. 20 वर्षांच्या कालखंडात त्यांना घोड्यावरून खाली उतरताना कोणी पाहीले नसावे. शनिवारवाड्याचे निर्माण, पाण्याची व्यवस्था, वाईट चाली-रितींविरोधात लढाई आणि उत्तम प्रशासक म्हणून बाजीरावांनी उत्तम काम केले.

अमित शाह पुढे म्हणाले, बाजीरावांच्या सैन्यात एका शिपायासोबत 3 घोडे असायचे. एक घोडा दमला की दुसऱ्या घोड्यावर स्वार व्हायचा आणि पुढे निघायचा. वीजेप्रमाणे ते शत्रूंवर तुटून पडायचे.  या वीजेच्या चपळाईमुळे भलेभले पराभूत झाले. मी विचारही करू शकत नाही की इतक्या विपरीत परिस्थितीत एक माणूस 41 लढाया लढतो आणि त्यात यश मिळवतो.

बाजीरावांच्या लढाईचे वैशिष्ट्य होते की ते स्वत:साठी कधीही लढले नाही ते देशासाठी आणि स्वराज्यासाठी लढत होते

मी कधी निराश झालो तर माझ्या मनात बालपणीचे शिवाजी महाराज आणि थोरल्या बाजीरावांचा विचार येतो आणि नैराश्य गायब होते. जर ते इतक्या बिकट परिस्थितीत लढले असतील तर आपण त्यांच्या तुलनेत फार सुस्थितीत आहोत. 

स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज पडली तेव्हा केला,  स्वराज्य टीकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आआपले नैतृत्व आणि सैन्य ते नेहमी करेल आणि ऑपरेशन सिंदूर याचे उत्तम उदाहरण आहे.  स्वराज्यासोबतच महान भारताची रचना ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना आहे.  भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा सगळ्या जगात, सगळ्या क्षेत्रात अव्वल असो अशा भारताची निर्मिती हे आपले लक्ष असले पाहीजे. त्यासाठी पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदानासाठी कोणी प्रेरणा असेल तर ते म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com