जाहिरात

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण: माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक

वेगवेगळ्या ठिकाणी हगवणे पिता- पुत्राला आश्रय देणाऱ्या पाच जणांना आता अटक करण्यात आली आहे.

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण: माजी मंत्र्याच्या मुलासह 5 जणांना अटक

अविनाश पवार, पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्यासह कुटुंबातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून फरार हगवणे पिता-पुत्राला मदत केल्याप्रकरणी आणखी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर सात दिवस राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे फरार झाले होते. पुण्यापासून सातारा जिल्ह्यातील पुसेगावपर्यंत त्यांनी आश्रय घेतला. या वेगवेगळ्या ठिकाणी हगवणे पिता- पुत्राला आश्रय देणाऱ्या पाच जणांना आता अटक करण्यात आली आहे.

मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, (वय 60, रा. वडगाव, मावळ) बंडू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा) अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसगाव, खटाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसगाव, खटाव, सातारा), प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव)  अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी प्रीतम पाटील हे काँग्रेसचे माजी आमदार वीरकुमार पाटील यांचे पुत्र असून वीरकुमार पाटील यांनी सलग 28 वर्षे आमदार म्हणून कार्य केलं असून त्यांच्या कार्यकाळात ते उर्जामंत्री देखील होते.

(नक्की वाचा: Mumbai Rain Red Alert: मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS)

दरम्यान, बवधान पोलिस ठाण्यातील गुन्हा क्र. 206/25 अंतर्गत भारतीय दंड संहिता (BNS) कलम 80(2), 108, 115(2), 352, 351(2), 118(1), 3(5), 61(2), तसेच बाल न्याय (JJ) कायदा कलम 75, 87 आणि हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 अंतर्गत आज पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com