जाहिरात
1 hour ago

Maharashtra Live Blog: गेल्या काही दिवसांपासून राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणात वैष्णवी हगवणेच्या पती, सासू, सासऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच हगवणे कुटुंबाला मदत करणाऱ्या निलेश चव्हाणचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

LIVE Updates: ठाणे-बेलापूर रोडवर ट्रक अपघात; वाहतूक काही काळ विस्कळीत

ठाणे-बेलापूर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एक ट्रक उलटल्याची घटना घडली. बेलापूरहून ठाण्याच्या दिशेने जात असताना महापे ब्रिजजवळ ट्रक पलटी झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या अपघातामुळे मुख्य मार्गावर वाहतूक अडथळ्याला सामोरी गेली आणि ठाण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली. ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली असून ट्रकमधील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक रस्त्याच्या कडेला हलवण्याचे काम सुरू होते.

LIVE Updates: एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडला

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडला आहे

ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वी कामगिरीबद्दल मोदींचे अभिनंदन करण्याचा ठराव 

जो भारताकडे पाहेल तो पराभूत होईल... हे भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे ते सिद्ध केले करूया.

ऑपरेशन सिंदूरने प्रत्येक भारतीयाला स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची प्रेरणा दिली.

LIVE Updates: ऑपरेशन सिंदूर नव्या भारताचे जिवंत चित्र: PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात.. देशातील एनडीएचे सर्व मुख्यमंत्र्यांची उपस्थिती...

LIVE Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरला दाखल होणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री नागपूरला दाखल होणार आहेत.

 सोमवार 26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील प्रस्तावित निवासाचे त्याचप्रमाणे चिचोली येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचे भूमिपूजन होणार आहे.

 रविवारी रात्री  अमित शहा यांचे नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळा समोर हॉटेल प्राईड जवळ भाजपकडून स्वागत करण्याची तयारी सुद्धा करण्यात आली आहे.

 ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविल्यानंतर तसेच माओवाद्यांच्या विरोधात यशस्वी कारवाई राबविल्यानंतर अमित शहा यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उत्साह आहे.

LIVE Updates: कोकणातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल पर्यटन तेजीत असतं. मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल होतात. मात्र 20 मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्याने कोकणातील पर्यटनाला पूर्णपणे ब्रेक लागला असून पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.

LIVE Updates: रिसोड शहरातील मुख्य पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

  वाशिम जिल्ह्यातील रिसोडला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली आहे. रिसोड-वाशीम मार्गावर महानंदा पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. एका ट्रेलरमधून पोकलेन काढताना ते अचानक पलटी झाले. पोकलेन सरळ करण्यासाठी घटनास्थळी क्रेन आणि जेसीबी बोलवण्यात आली होती. मात्र जेसीबीने खड्डा खोदताना मुख्य पाईपलाईन फुटली आणि लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

LIVE Updates: गडचिरोली शहारात रात्रीचा सुमारास मुसळधार पाऊस

हवामान विभागाने  4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता त्याच अंदाजा  नुसार रात्री चा सुमारास अवकाळी पावसाने वीज गर्जनासह 1 तास  शहराला झोडपून काढले त्यामुळे वातावरणात थंडावा जाणवत असून काहीशा प्रमाणात नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळाला असल्याचे दिसून येत आहे.........

LIVE Updates: नंदुरबारमध्ये तिरंगा यात्रा

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात तिरंगा यात्रा  काढण्यात आली भारतीय सैन्याच्या गौरवार्थ व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ भाजपा शहादा शहर व तालुक्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक बंधु- भगिनींच्या वतीने तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते तिरंगा यात्रा श्रीराम मंदिर, हुतात्मा लालदास चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंत काढण्यात आली

LIVE Updates: महिलेची बस स्टॅँडवर प्रसुती

नंदुरबार जिल्ह्यातील रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते त्याचप्रमाणे सूर्यपुर येथील काही परिवार रोजगारासाठी स्थलांतरित झाले होते गावाकडे परत येत असताना तळोदा बस स्थानकाजवळ यातील एका महिलेला प्रसूती वेदना होण्यास सुरुवात झाली नातेवाईकांनी तळोदा बस स्थानकात ताडपत्री आणि कापडाचा आडोसा करत सदर महिलेचे बाळंतपण केले बाळंतपण केल्यानंतर सदर महिलेला आणि तिच्या नवजात बालकाला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची काळजी घेतली जात आहे एकीकडे सरकार सुरक्षित बाळंतपणाचे दावे करत असताना बस स्थानक किंवा गजबजलेल्या ठिकाणी आरोग्य सुविधा का नसतात असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com