जाहिरात

कोणाला सर्वाधिक मताधिक्य तर कुठे 'नोटां'चा पाऊस; विधानसभा निकालातील Interesting गोष्टी 

महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करीत महायुतीचा महाविजय झाला. महायुतीच्या विजयाचा स्टाइक रेट ७४.७९ टक्के इतका आहे.

कोणाला सर्वाधिक मताधिक्य तर कुठे 'नोटां'चा पाऊस; विधानसभा निकालातील Interesting गोष्टी 
मुंबई:

महाविकास आघाडीला चारीमुंड्या चीत करीत महायुतीचा महाविजय झाला. महायुतीच्या विजयाचा स्टाइक रेट ७४.७९ टक्के इतका आहे. २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे.  दुसरीकडे महाविकास आघाडीला ४६ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. ही निवडणूक अनेकांसाठी अनपेक्षित होती. मात्र लाडक्या बहिणींनी महायुतीला साथ देत विजयी केल्याची चर्चा आहे. 

Maharashtra Chief Minister : आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

नक्की वाचा - Maharashtra Chief Minister : आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान?
भाजप - 26.77
शिंदेसेना - 12.38
अजित पवार गट - 09.01

काँग्रेस - 12.42
ठाकरे गट - 9.96
शरद पवार गट - 11.28

इतर - 18.18

सर्वाधिक मताधिक्याने कोण विजयी?
काशिराम पावरा - १,५९,०४४
शिवेंद्रराजे भोसले - १,४२,१२४
धनंजय मुंडे - १,४०,२२४
दिलीप बोरसे - १,२९,२९७
आशुतोष काळे - १,२४,८२४

महायुती-मविआमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या अन् जिंकल्या? कोणाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त?

नक्की वाचा - महायुती-मविआमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या अन् जिंकल्या? कोणाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त?

अवघ्या काही मतांनी विजय...
मुफ्ती मोहम्मद - १६२
नाना पटोले - २०८
मंदा म्हात्रे - ३७७
संजय गायकवाड - ८४१
शिरीषकुमार नाईक - ११२१

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ७० हजारांहून अधिक मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. सर्वाधिक नोटा मते अणुशक्तीनगरमध्ये असून त्याची संख्या ३,८८४ आहेत. सगळ्यात कमी नोटा मते मानखुर्द शिवाजी नगरमध्ये असून त्याची संख्या फक्त १३० आहे. 

गीता जैन यांचे डिपॉझिट जप्त
मीरा-भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र मेहता यांनी ६० हजार मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. मेहता यांच्यासमोर अपक्ष आमदार गीता जैन आणि काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांचे आव्हान होते. गीता जैन यांना केवळ २३ हजार ५१ मते पडल्याने त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com