मनसेमुळे उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! 10 जागांवर उडाला असता धुरळा; वाचा 'राज'कारण

मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी मनसेमुळे उद्धव ठाकरे यांच्या मात्र १० जागा वाढल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला आहे. मनसेने विधानसभा निवडणुकीत १२७ उमेदवार दिले होते. यांपैकी एकही जागा निवडून आली नाही. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी मनसेमुळे उद्धव ठाकरे यांच्या मात्र १० जागा वाढल्या आहेत. कोणत्या आहेत या जागा अन् काय आहे समीकरण? वाचा सविस्तर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांमुळे उद्धव ठाकरेंचे मुंबईमधील १० उमेदवार विजयी झाले. मुंबईतील माहीम, वरळी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कालिना आणि वांद्रे पूर्व या महत्वाच्या जागा मनसेमुळे ठाकरेंच्या पारड्यात पडल्या. माहिममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरेंचा पराभव केला. इथे अमित ठाकरे यांना 33,062 मते मिळाली तर महेश सावंत यांना 50,213 मते मिळाली.

वरळी विधानसभा:
 ठाकरे गटाचे उमेदवार (विजयी): आदित्य ठाकरे, 63324 मते
 मनसे उमेदवार: संदीप देशपांडे, 19367 मते 
शिंदे गटाचे उमेदवार: मिलिंद देवरा, 54523 मते

विक्रोळी विधानसभा: 
मनसेचे उमेदवार – विश्वजीत ढोलम, 16, 813 मते

ठाकरे गटाचे विजयी उमेदवार – सुनील राऊत,  66, 093 मते

शिंदे गटाचे हरलेले उमेदवार – सुवर्णा करंजे,  50, 567  मते

नक्की वाचा:  सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...

जोगेश्वरी पूर्व विधानसभा:
मनसे उमेदवार – भालचंद्र अंबुरे 12,805 मते
 ठाकरे गटाचे उमेदवार -अनंत (बाळा ) नर,  77, 044 मते
शिंदे गटाचे उमेदवार – मनीषा वायकर, 75,503 मते

Advertisement


दिंडोशी विधानसभा:
विजयातील अंतर – 6182 मते

युबीटीचा विजयी उमेदवार – ( मते- ७६,४३७ ) 76, 437 मते

मनसेची मते –  6, 752

वर्सोवा विधानसभा: 

विजयातील अंतर – 1600 मते

ठाकरे गटाचे विजयी उमेदवार – 65,396 मते
मनसेची मते – 6752

महत्वाची बातमी: महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली

कालिना विधानसभा: 

विजयातील अंतर – 5,008 मते

ठाकरे गटाचे विजयी उमेदवार – 59, 820 मते

मनसेची मते , 6752 मते 

वांद्रे पूर्व विधानसभा:

विजयातील अंतर 11, 365 मते

ठाकरे विजयी उमेदवार: 57, 708 मते

मनसेची मते – 6062

वणी विधानसभा:
विजयातील अंतर -15,560 मते

ठाकरे गटाचे विजयी उमेदवार: 94,618 

मनसेची मते: 21, 977

गुहागर विधानसभा:

विजयातील अंतर : 2830

ठाकरे गटाचे विजयी उमेदवार : 71241 मते

मनसेची मते : 6, 712 मते

बीडमधील 6 मतदारसंघात नेमकं काय घडलं? महायुतीने लोकसभेतून कसा घेतला धडा?