बाबासाहेबांचं लंडनमधील घर नाशिकमध्ये अवतरलं !

जाहिरात
Read Time: 2 mins
बाबासाहेबांचं लंडनमधील घर नाशिकमध्ये अवतरलं !
नाशिक:

नाशिक, किशोर बेलसरे 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी केली जात आहे. नाशिकमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीने जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर शालीमार चौकात उभारण्यात आलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बाबासाहेब लंडनमध्ये ज्या घरात रहात होते त्याचा डिक्टो देखावा उभारण्यात आला आहे.  लंडनला जाणे शक्य नाही. त्यामुळे अनेक जण हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहे. बाबासाहेबांचे हे निवास्थान पाहाताना आपण काही क्षण लंडनमध्ये तर नाही ना असा भास होतो. हा देखावा  40 फूट उंचीचा आहे. याचं चित्र सागर शिरसाठ यांनी तयार केल आहे, तर मुंबईचे सुनील समजस्कर यांनी हा देखावा सादर केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी संदेश 
 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशमधील महू या गावी सैनिक छावणी येथे 14 एप्रिल 1891साली झाला. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने जेवढे लेखन केले नाही तेवढे लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहेत. लंडन येथील घरात 'द प्रॉब्लेम ऑफ रुपीज' हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. हे घर महाराष्ट्र शासनाने सन 2015 मध्ये 35 कोटी रुपयांत विकत घेऊन त्यात बाबासाहेबांचे स्मारक उभारले आहे. या देखाव्याची संकल्पना समाज सेवक डेन केबलचे संचालक आनंदभाऊ सोनवणे यांची असून  हा देखावा पाहण्यासाठी जिल्ह्यासह शहरातील भीमसैनिक, नागरिकांनी  यावं असं अवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

'राजीव गांधींचं पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू काँग्रेसमध्ये बेदखल'

बाबासाहेब हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. बाबासाहेबांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी पूर्ण लिहिलेले एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 अपूर्ण लिहिलेले ग्रंथ, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह बाबासाहेबांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. 

'तो' प्रश्न आणि सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात टचकन पाणी! नेमकं काय घडलं?

मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे 40 पेक्षा जास्त खंडावर प्रकाशीत झाली आहे. त्यांची साहित्यकृती त्यांच्या विशिष्ट सामाजिक दृष्टीकोनासाठी आणि विद्वत्तेसाठी प्रख्यात आहे, जी त्यांच्या काळातील त्यांची दूरदृष्टी आणि पुढचा विचार दर्शवते. बाबासाहेबांचे ग्रंथ भारतासह जगभर मोठ्या प्रमाणावर वाचले जातात. 

Advertisement