वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी अधिकाऱ्याने चक्क शेतकऱ्यावर बूट उगारला. सचिन कांबळे असं मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याचे नाव असून, ऋषिकेश पवार असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
वादाचे नेमके कारण काय?
पीडित शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा (MGNREGA) अंतर्गत फळबाग लागवड केली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून या कामाची मजुरी रखडली होती. वारंवार मागणी करूनही अनुदान मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी केली. जिल्हा स्तरावर तक्रार झाल्यामुळे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे याच्यावर दबाव वाढला होता. याचाच राग त्याच्या मनात होता.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
शेतकऱ्यावर बूट उगारला!
सचिन कांबळे गोगरी शेत शिवारात पाहणीसाठी आले होते. यावेळी शेतकरी ऋषिकेश पवार हे आपल्या मोबाईलवर या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करत होते. व्हिडिओ काढताना पाहून अधिकारी कांबळे यांचा पारा चढला. त्यांनी "व्हिडिओ का काढतो?" असा सवाल करत शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला.
(नक्की वाचा- BMC Election 2026: दुबार मतदार असाल तरी करता येईल मतदान; या गोष्टी कराव्या लागतील)
तक्रारीचा राग मनात धरून अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्यांनी अंगावर धावून जात बूट उगारला आणि शिवीगाळही केली. या घटनेनंतर सचिन कांबळे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world