जाहिरात

Water Crises : राज्यातील टँकरचा आकडा 200 पार; राज्यातील 784 गावं-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

Water Crises in Maharashtra : राज्यातील 2 हजार 599 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात 43.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Water Crises : राज्यातील टँकरचा आकडा 200 पार; राज्यातील 784 गावं-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

Water Crises : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाचा पाणीटंचाईची समस्या जाणूव लागली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाण्याची कमी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच राज्यातील टँकरचा आकडा दोनशे पार गेला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात एकूण 14 जिल्ह्यांमधील 784 गावं-वाड्यांवर एकूण 223 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक 65 टँकर  पुणे विभागात सुरू असून, सर्वाधिक 40 टँकर सातारा जिल्ह्यात सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होत आहे. 

(नक्की वाचा-  CNG-PNG Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका; सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ)

राज्यातील 2 हजार 599 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात 43.67 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(नक्की वाचा-  Rohit Pawar : विधानसभेतील मविआच्या कामगिरीवरुन रोहित पवारांची नाराजी, म्हणाले...)

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा

जायकवाडी : 49.86 टक्के 
निम्न दुधना : 42.07 टक्के 
येलदरी : 59.35 टक्के 
सिद्धेश्‍वर : 61.10 टक्के 
माजलगाव : 38.13 टक्के 
मांजरा : 42.74 टक्के 
पैनगंगा : 57.81 टक्के 
मनार : 50.63 टक्के 
निम्न तेरणा : 62.71 टक्के 
विष्णुपुरी : 39.87 टक्के 
सीना कोळेगाव : 18.51 टक्के 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: