
कडक उन्हामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता अवकाळीचं सावट घोंगावत आगे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात पावसाचा अंदाज आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाशिक, नाशिक घाट, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे ही दोन्ही जिल्ह्याला आज पावसाचा अंदाज नाही. या दोन्ही जिल्ह्यातील वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नक्की वाचा - मुंबईचा प्रवास सुसाट! BKC ते वरळी मेट्रो मार्गाचे लोकार्पण, स्टेशनसह फेऱ्यांची संख्या आणि तिकिटाचे दर जाणून घ्या
वाशिम-नंदूरबारमध्ये अवकाळी पावसाचं थैमान...
वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर नंदुरबारमध्ये चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलंय. अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला मे महिन्यात पूर आला आहे. पूरामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. सातपुड्याच्या डोंगराळ भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला मे महिन्यात पूर आल्याचं पाहण्यास मिळाले. उन्हाळ्यात नदीला पूर आल्याचं पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नंदूरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world