फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट एका घराच्या बाल्कनीत जाऊन पडल्यानं घराला आग लागल्याची घटना बदलापूरमध्ये घडली. सुदैवाने यावेळेस घरात कुणीही नसल्यानं कुणालाही इजा झाली नाही. मात्र घरातील काही साहित्य जळून खाक झालं.
बदलापूरच्या खरवई परिसरातील प्रेशियस हेरिटेज इमारतीत गुरुवारी रात्री11 वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या इमारतीबाहेर कुणीतरी फटाके फोडत होतं. यावेळी उडवलेलं रॉकेट थेट ४०५ क्रमांकाच्या फ्लॅटच्या बाल्कनीत येऊन पडलं. त्यामुळे बाल्कनीत असलेल्या साहित्याने पेट घेतला आणि मोठी आग लागली. या आगीमध्ये बाल्कनीत ठेवलेली पुस्तकं, सायकल आणि लाकडी साहित्य जळून खाक झाली आहेत.
दिवाली का रॉकेट बालकनी पर गिरा और घर में आग लग गई..
— NDTV India (@ndtvindia) November 1, 2024
बदलापुर के खरवई इलाके की घटना. मकान बंद होने के कारण कोई हताहत नहीं हुआ।#Diwali2024 #Badlapur pic.twitter.com/Y1DJiUqSXO
इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि आग विझवल्यानं मोठं नुकसान टळलं. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात नागरिकांनी घर बंद करून जाताना बाल्कनीत कपडे, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, असं आवाहन अग्निशमन दलानं केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world