प्रतिनिधी, गुरू दळवी
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. एकेकाळचे पक्के मैत्री राजकीय वैरी झाले, त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात राजकीय मतभेद झाल्यानंतर केसरकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राणे आणि केसरकर यांच्यातील राजकीय संघर्ष तब्बल दहा वर्ष पाहायला मिळाला होता.
मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केसरकर यांनी नारायण राणेंच्या कणकवली निवासस्थानी दाखल होत मैत्रीच एक पाऊल पुढे टाकला होता. आता खुद्द नारायण राणे यांनी केसरकर यांच्या सावंतवाडी निवासस्थानी दाखल होत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली. तब्बल दहा वर्षांनंतर राणेंनी केसरकर यांच्या निवासस्थानी आले आहेत. राणे आणि केसरकर दोघेही एकत्रितपणे आज सावंतवाडी मतदारसंघात प्रचार करणार असल्याची माहिती आहे.
नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद सर्वश्रूत
केसरकर आणि राणे दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते. शिवसेनेत असताना केसरकरांनी राजकीय दहशतवाद म्हणत कायमच राणेंना लक्ष्य केलेलं आहे. या वादाची सुरुवात सावंतवाडी नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदापासून सुरू झालेली आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा दीपक केसरकर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिले होते. त्यावेळी शरद पवार यांनी नारायण राणे आणि केसरकर यांच्या समेट घडवून आणला होता. यानंतर केसरकर पहिल्यादा सावंतवाडीतून आमदार म्हणून निवडून आले. मात्र दोघांमधील वाद कमी होत नव्हता. राणेंना टार्गेट करणारे केसरकर 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेले त्यानंतर 2014 पासून आतापर्यंत दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर जिल्ह्यात दहशतवाद केल्याचा आरोप करत राहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात दीपक केसरकर 2014 मध्ये शिवसेनेत गेल्यानंतर राणेच्या विरोधात बोलण्यास केसरकराना खुल मैदान मिळालं. त्यामुळे 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर नेहमी राणेंच्या विरोधात बोलत असताना दहशतवाद या मुद्द्यावर बोलत राहिले.
2014 च्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेनेच्या वतीने केसरकर यांनी राणेंनी दहशतवाद निर्माण केल्याचा मुद्दा प्रचारात आणला. विधानसभा निवडणुकीत राणेंना याचा फटका बसला आणि पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव राणेंच्या जिव्हारी लागला. यानंतर आजपर्यत जाहीर व्यासपीठावर बोलताना ते केसरकरवर टीका करताना दिसतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world