जाहिरात

'फूट पाडा आणि सत्ता मिळवा' हा काँग्रेसचा फॉर्म्युला, हरियाणातील यशानंतर पंतप्रधान मोदींची सडकून टीका

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Congress) महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्पाची भेट देताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.

'फूट पाडा आणि सत्ता मिळवा' हा काँग्रेसचा फॉर्म्युला, हरियाणातील यशानंतर पंतप्रधान मोदींची सडकून टीका
नागपूर:

हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने कमबॅक केल्याचं दिसून येत आहे. मंगळवारी निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भाजप मुख्यालयातून (Assembly election results in Haryana and Jammu Kashmir) भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Congress) महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्पाची भेट देताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. यावेळी त्यांनी सुमारे 7000 कोटींचा खर्च अपेक्षित असलेल्या नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणासाठी पायाभरणी केली. याचा पर्यटन, लॉजिस्टिक, आरोग्य सेवा आदींसाठी फायदेशीर ठरले, याचा परिणाम नागपूर शहराबरोबरच विदर्भावर होईल असा विश्वास मोदींकडून व्यक्त करण्यात आला. 

यावेळी मोदी हरियाणाच्या विधानसभा निकालाबद्दल म्हणाले, काल हरियाणा आणि जम्मू कश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरियाणातील निकालांनी देशाचा मूड काय आहे हे दाखवून दिले आहे.  काँग्रेसची पूर्ण इको सिस्टीम, अर्बन नक्षलवाद्यांची टोळी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसचे सगळे प्रयत्न उद्ध्वस्त झाले. दलितांमध्ये काँग्रेसने खोटं परसवण्याचा प्रयत्न केला मात्र दलितांनी त्यांचे मनसुबे ओळखले. हरियाणातील दलित वर्गाने भाजपला रेकॉर्ड ब्रेक समर्थन दिले आहे. 

'भारत तोडण्याच्या कटात काँग्रेस सहभागी', हरियाणा जिंकल्यानंतर PM मोदींचा हल्लाबोल

नक्की वाचा - 'भारत तोडण्याच्या कटात काँग्रेस सहभागी', हरियाणा जिंकल्यानंतर PM मोदींचा हल्लाबोल

मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसने सातत्याने फूट पाडा आणि सत्ता मिळवा फॉर्म्युला वापरला आहे. काँग्रेसने सातत्याने सिद्ध केलं आहे की तो बेजबाबदार पक्ष बनला आहे. काँग्रेस , देशात विभाजन करण्यासाठी नवनवी नॅरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. मुसलमानांना घाबरवा , व्होट बँकमध्ये बदला आणि ही व्होट बँक मजबूत करा यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले.  काँग्रेस मुसलमानांमधील जातींबद्दल कधीच बोलत नाही. हा विषय आला की काँग्रेस नेत्यांच्या तोंडाला कुलूप लागते. मात्र हिंदूंचा विषय आला की काँग्रेस त्यांच्या जातींवरूनच आपली चर्चा सुरू करते.  हिंदूमध्ये जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आली आहे. हिंदू समाजात आग लावण्याचा काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आली आहे. काँग्रेस समाजात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी मोदींनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या शेतकरी कल्याण योजनेचा उल्लेख केला. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावले, मात्र शेतकऱ्यांना माहिती आहे की एमएसपी कोणी दिली. शेतकरी कल्याण योजनेमुळे खूश आहे. 

नागपूरमध्ये कोणत्या कामांची उभारणी?

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ एकीकृत टर्मिनल इमारत
  • टर्मिनल इमारतीची अंदाजे बजेट 7 हजार कोटी
  • दोन समांतर धावपट्टी, सध्याच्या धावपट्टीचे विस्तारीकरण
  • नव्या धावपट्टीची निर्मिती, नव्या टर्मिनल इमारतीचा विकास
  • नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास
  • 100 विमानांना सामावून घेण्यासाठी पार्किंग बे


शिर्डीत कोणत्या कामांची तयारी?

  • नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची उभारणी
  • अंदाजे बजेट- 645 कोटी रुपये
  • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जातील
  • प्रवासी वाहन क्षमतेमध्ये वाढ 
  • धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार
  • स्थानिकांना रोजगार निर्मिती

Previous Article
'हवेत जाऊ नका' हरियाणाच्या निकालानंतर मविआची वादळी बैठक, राऊत- पटोले भिडले?
'फूट पाडा आणि सत्ता मिळवा' हा काँग्रेसचा फॉर्म्युला, हरियाणातील यशानंतर पंतप्रधान मोदींची सडकून टीका
haryana-assembly-election-decides-future-bjp-president-dharmendra-pradhan-trusted-partner-of-pm-modi-team-ahead-in-the-race
Next Article
मोदींच्या स्वप्नाचा शिल्पकार, हरियाणात केला चमत्कार! मिस्टर डिपेंडेबल होणार भाजपाचा अध्यक्ष?